आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीपाला विक्रेत्यांचा अात्महत्येचा इशारा, ८६ हाॅकर्सनी काढले पत्रक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्या१५ दिवसांपूर्वी सुभाष चाैकातून स्थलांतरित झालेल्या भाजीपाला विक्रेत्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली अाहे. पुरेसा व्यवसाय हाेत नसल्याने अार्थिक विवंचना निर्माण हाेत असून, याेग्य जागा दिल्यास सर्व विक्रेते सामूहिक अात्महत्या करतील, असा इशारा दिला अाहे. अाठवडाभरापासून तापमानात हाेणारी वाढदेखील गिऱ्हाईकी कमी हाेण्यास कारणीभूत ठरत अाहे.

सुभाष चाैकातून न्यू.बी.जे.मार्केटच्या अावारात स्थलांतरित केलेेल्या भाजीपाला अन्य विक्रेत्यांची शुक्रवारी दुपारी बैठक झाली. त्या वेळी त्यांनी अापल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर ८६ विक्रेत्यांच्या नावाचे पत्रक प्रसिद्धीस दिलेे अाहे. त्यात न्यू.बी.जे. मार्केटमध्ये पुरेशी जागा नसताना हाॅकर्सना बसवले अाहे. ग्राहकांना चालायलाही जागा नाही. स्वच्छतागृह तसेच पिण्याच्या पाण्याचीही साेय नसल्याची तक्रार हाॅकर्सनी केली अाहे. सायंकाळी मार्केट लवकर बंद हाेत असल्याने वीजपुरवठ्याचीही समस्या अाहेच. निव्वळ फेरीवाला धाेरण न्यायालयाचे अादेश सांगून ३३२ विक्रेत्यांची फसवणूक केल्याचे हाॅकर्सचे म्हणणे अाहे. हाॅकर्सने अतिक्रमण विभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही तक्रार केली अाहे. महिला हाॅकर्सना दादागिरी करत शिवीगाळ करून त्रास दिला जात असल्याचे नमूद करत अतिक्रमण पथकातील वाहनामुळे साडेचार वर्षीय डिंपल प्रवीण पाटील या बालिकेच्या उजव्या पायाला जखम झाली हाेती. दरम्यान, अायुक्तांकडे गेल्यास तेदेखील दुर्लक्ष करीत अाहेत.

उन्हाचाही प्रभाव
वाढत्यातापमानाचाही व्यवसायावर परिणाम जाणवत असल्याचे अनेक हाॅकर्सचे म्हणणे अाहे. सकाळी वाजेपासून सायंकाळी वाजेपर्यंत तापमान कायम राहत असल्याने ग्राहक दिवसा घराबाहेर पडणे टाळतात. त्यामुळे व्यवसाय ठप्प पडला अाहे, असे सांगितले.

उपासमारीची वेळ
स्थलांतरितझालेल्या हाॅकर्समध्ये बहुसंख्य भाजीपालाविक्रेते अाहेत. दरराेज दोन ते तीन हजारांचा माल खरेदी करायचा अाणि व्यवसाय केवळ १५० ते २०० रुपयांचा हाेत अाहे. त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत अाहे. व्यवसाय नसल्याने माल खराब हाेण्याचे प्रमाणही वाढले अाहे. त्यामुळे उपासमारीची वेळ येत असल्याचे पत्रकात म्हटले अाहे.
बातम्या आणखी आहेत...