आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाने भिकार्‍याला चिरडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील पांडुरंग टॉकीज चौकाला जळगाव, जामनेर आणि यावलकडे जाणार्‍या खासगी प्रवासी वाहनांचा गराडा असतो. या मुळे पादचार्‍यांना येण्या-जाण्यासाठी रस्ता शिल्लक राहत नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने रस्त्यावरून जाणार्‍या भिकार्‍याला अक्षरश: रस्त्यावरच चिरडले. डोक्याला जबर मार लागल्याने भिकार्‍याचा रस्त्यावरच तडफडून मृत्यू झाला. मात्र, परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येण्यापूर्वीच चिरडणार्‍या गाडीने घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठचे सहायक पोलिस निरीक्षक पी.बी.भोंडवे, उपनिरीक्षक नितीन पाटील, हवालदार राजेंद्र साळुंखे, शशिकांत पाटील यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह उचलून पालिका दवाखान्यात रवाना केला. खाद्यपदार्थ विक्रेता देवेंद्र चौधरी यांच्या खबरीवरून अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.