आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनचालकांसह पालक, शिक्षकांना गांभीर्य नाही, सुविधा नसलेल्या वाहनांमधून विद्यार्थ्यांचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विनापरवानावाहनांची काळजी घेण्याचा निष्काळजीपणा यामुळे शहरातील शालेय वाहतूक ही असुरक्षित बनली आहे. नाशिक येथील शालेय वाहनाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर ‘दिव्य मराठी’ने शहरातील शालेय वाहनांचे सर्वेक्षण केले असता, हे चित्र समोर आले आहे. यासह बहुतांश शाळांमध्ये परिवहन समितीची बैठक घेऊन त्यात पालक, वाहनचालक शिक्षकांना याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र, या बैठकाच घेतल्या जात नसल्याने या विषयाचे गांभीर्य राहिले नसल्याची स्थिती आहे.
शहरात विविध माध्यमांच्या शाळांमध्ये शहरातील विविध भागांसह तालुक्यातून मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांची शालेय वाहतूक केली जाते. खराब रस्त्यांसह बेशिस्त वाहतुकीमुळे शालेय वाहनांच्या अपघाताच्या घटना या आधीही घडल्या आहेत. यासह रिक्षा, व्हॅन, यासह शालेय बसेसची योग्य निगा काळजी घेतली जात नसल्याने वाहने बंद पडून विद्यार्थ्यांना तासन््तास रखडून पडण्याच्या घटनाही सातत्याने दिसून येतात. मात्र, नाईलाजाने विद्यार्थ्यांना खराब सुविधा नसलेल्या वाहनांमध्ये प्रवास करावा लागतो. विद्यार्थी शाळेसाठी व्हॅनमध्ये बसून घरातून बाहेर पडल्यानंतर पालक निर्धास्त होतात. मात्र, त्या वाहनातून प्रवास करणार आहे, ती वाहने सुरक्षित आहेत का? याची साधी चाचपणीही पालकांकडून होत नाही. याकामी पालकांची उदासीनता कायम आहे. नादुरुस्त वाहनांमुळे येण्यास उशीर झाल्यानंतर पालक मात्र याविषयी ओरड करतात.
स्वतंत्र वाहनतळ
- वाहने लावण्यासाठी,स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली आहे. आरटीओने ठरवून दिलेल्या वाहनांनाच परवानगी आम्ही देतो. यासह तीन महिन्यानंतर पालकांची सभा घेऊन या विषयावर चर्चा होते. वाहनचालकांनाही वाहने सुरक्षित ठेवण्याविषयी सांगितले जाते. परिवहन समिती सभा घेऊन त्यात वाहतुकीचे प्रश्न सोडवले जातात. -
वैजयंतीतळेले, मुख्याध्यापक, ए.टी. झांबरे विद्यालय
शालेय व्यवस्थापन समित्यांचीही टाळाटाळ
नियमावलीची शिस्त लावली जाते
^आमच्याशाळेचीस्कूलबस नाही. पालक आपल्या जबाबदारीवर वाहने निवडतात. मात्र, ही वाहने सुरक्षित असावी वाहनचालकांना पार्किंगसह विविध नियमांची शिस्त असावी यासाठी नियमावली सांगितली जाते. पालकसभेत याविषयी वाहनचालकांनाही सूचना दिल्या जातात. पालकांची तक्रार असल्यास वाहनचालकास कळवले जाते.
सुषमाकंची, प्राचार्य, ओरिएन सीबीएसई

वाहनचालकांचे अर्थकारण
आरटीओच्यानियमानुसार वाहनात बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही परवडणारी असल्याचे वाहनचालक सांगतात. शहरातील किमान किलोमीटरच्या परिसरातील कोणत्याही शाळेसाठी एका विद्यार्थ्यामागे ५०० ते ६०० रुपये व्हॅन तसेच िरक्षाचालक घेतात. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी यात बसवले जातात. शालेय रिक्षामध्ये निश्चित सीटपेक्षा दीडपट मुले बसवण्यास परवानगी असताना, एकावेळी १२ ते १४ विद्यार्थी बसवले जातात. व्हॅनमध्ये ही संख्या २० पेक्षा जास्त असते. यावरही वाहनचालकांकडून ही वाहतूक परवडत नसल्याची ओरड अाहे. ५०० रुपयांप्रमाणे एका रिक्षाचालकास एका फेरीस महिन्याला ते १० हजार रुपये मिळतात. या तुलनेत पेट्रोल, डिझेल वगळता वाहनाची सुरक्षितता अन्य सुविधांवर खर्च होत नाही. दिवसाला दोन ते तीन फेऱ्यांसह प्रवासी वाहतूक करतात. अशा स्थितीतही परवडत नसल्याचे काही शालेय वाहनचालकांनी सांगितले.

वर्षातून दोनदा समितीची बैठक घेणे आवश्यक
वर्षातून दोनदा शालेय समितीची बैठक घेणे आवश्यक आहे. मात्र, ही बैठक घेण्यासाठी शालेय व्यवस्थापन शासकीय यंत्रणेची तर यंत्रणा शाळेची वाट बघत असतात. या कामी पुढाकार घेतला जात नसल्याने या विषयावर चर्चा होत नाही. शिक्षण विभाग बैठक घेण्याचे पत्र देतात, तर आरटीओ प्रतिनिधी आपणास बोलावण्याची वाट पाहतात. या उलट अधिक विषयावर चर्चा नको, म्हणून शालेय व्यवस्थापनही या कामी टाळाटाळ करीत असल्याचे बहुतांश पालकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

मोठ्या शाळांमधील वाहनांमध्येच सुविधा
शहरातील विनाअनुदानित शाळांकडे प्रवेशाचा ओढा अधिक आहे. ओरिएन सीबीएसई, वर्धमान, सेंट लॉरेन्स, सेंट टेरेसा यासह विविध विनाअनुदानित शाळांमध्ये येणाऱ्या काही वाहनांमध्ये सुरक्षिततेची साधने दिसून येतात. या शाळांनी याची नियमावली केल्याने वाहनचालकांवर नियंत्रण आहे. अन्य अनुदानित शाळांमध्येही अवैध वाहतूक करणारी वाहनेच विद्यार्थ्यांची ने-आण करतात. शाळा व्यवस्थापनाकडून याची दखल घेतली जात नाही पालकही सभेत या विषयावर बोलत नसल्याचे चित्र दिसून आले आहे.
बातम्या आणखी आहेत...