आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vehicle News In Marathi, Permit To Gas Auto Issue Jalgoan, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गॅसवर चालणार्‍या ऑटो रिक्षांनाच द्यावेत परवाने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- परिवहन विभागातर्फे राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रिक्षांना नवीन परवाने देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी 1949 नवीन परवाने दिले जाणार आहेत. त्यामुळे सर्वच शहरात नवीन रिक्षांची संख्या वाढणार आहे. मुंबई, पुण्यात प्रदुषण टाळण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या रिक्षांना परवाने देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर जळगावातही परिवहन अधिकार्‍यांनी ते धोरण अवलंबिल्यास वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण ठेवता येईल.

गेल्या 20 वर्षांपासून परिवहन विभागातर्फे परमिट देणे थांबवले होते. राज्यभरातील रिक्षाचालक- मालक संघटनांनी आंदोलने करून नवीन परमिट देण्यासाठी विनंती केली होती. जळगाव जिल्ह्यासाठी 1949 परमिट देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. 1949 परमिटसाठी 2044 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. 27 फेब्रुवारीला मुंबईत या अर्जांची लॉटरी पद्धतीने छाननी करून निवड झालेल्या उमेदवारांना 1 मार्चपासून परमिट वाटप केले जाणार आहे.

  • नवे 1949 परवाने देण्याच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप
  • कार्बन मोनॉक्साइड मानवी शरीरात गेल्यास श्वसनाचे रोग
  • कार्बन कण डोळ्यांची चुळचुळ, स्किनची जळजळ
  • नायट्रोजन डायऑक्साइड पर्यावरणावर, फुफ्फुसांवर परिणाम


परिवहन अधिकार्‍यांच्या अधिकारात
प्रवासी वाहनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल वापरण्यापेक्षा सीएनजी किंवा एलपीजी गॅस वापरणे पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. गॅस वापरामुळे मोठय़ा शहरांमधील वाहनांमुळे होणार्‍या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. डॉ.आर.टी.इंगळे, विभागप्रमुख, पर्यावरण व भूगर्भशास्त्र विभाग, उमवि

एलपीजी किंवा सीएनजी वापरामुळेही कार्बन मोनॉक्साइड, कार्बन कण आदी बाहेर पडतात. मात्र, त्यांचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे पर्यावरण किंवा मानवी आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम तुलनेने कमी आहे.

प्रवाही इंधनापेक्षा गॅसमुळे होणारे प्रदूषण तुलनेने कमी
रिक्षांचा प्रकार ठरविण्याचे आरटीओंना आहेत अधिकार

अप्पर परिवहन आयुक्त एस.बी.सहस्त्रबुद्धे यांनी 5 फ्रेबुवारी रोजी परवाने वाटपासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला. राज्यातील मुंबई महानगर व पुणे, पिंपरी चिंचवड या क्षेत्राबाहेरील इतर जिल्ह्यातील इच्छुकांना फक्त पेट्रोल इंधन वापरणार्‍यांनाच परमिट देण्याचे सांगितले होते. मात्र, नंतर झालेल्या चर्चेअंती डिझेलसाठीही परवानगी देण्यात आली. शिवाय जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे धोरण व न्यायालयाच्या निर्णयानुसार रिक्षांच्या इंधन प्रकाराबद्दलचा निर्णय स्थानिक उपविभागीय परिवहन अधिकार्‍यांना घेता येईल, असे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक आरटीओला गॅसवर चालणार्‍या रिक्षांचे परमिट देण्याचा अधिकार मिळाला आहे.