आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर थोरे अद्यापही पदावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आरटीओ कार्यालयात 10 एप्रिल रोजी लाच घेताना अटक झालेल्या मोटार वाहन निरीक्षकावर निलंबनाची कारवाई न झाल्यामुळे ते वाहन निरीक्षक या पदावर कायम आहे. प्रशासनाच्या या सहानुभूतीच्या धोरणाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोटार वाहन निरीक्षक धनंजय विश्वनाथ थोरे असे या लाचखोर कर्मचार्‍याचे नाव आहे. थोरे याला त्याचा पंटर सत्यसिंग राजपूत याच्यामार्फत 400 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. या दोघांनी रिक्षाला योग्यतेचे प्रमाणपत्र देण्यासाठी 400 रुपयांची लाच घेतली होती. अटक केल्यानंतर त्यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवस पोलिस कोठडी मिळाल्यानंतर थोरे याला जामिनावर सोडण्यात आले होते. त्यानंतर सुमारे दीड महिना उलटल्यानंतरही थोरे याच्या निलंबनाचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी पाठवलेला नाही. थोरे यांच्यावर खटला सुरू झाल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे वारे यांनी सांगितले आहे. त्यामुळे थोरे वाहन निरीक्षक याच पदावर सध्या कार्यरत आहेत.