आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दत्तक दिलेल्या बालकांची पडताळणी, टाटिया शिशुगृहाची दुसऱ्या दिवशी तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - टाटिया शिशुगृहाने जळगाव जिल्ह्याबाहेर आणि विदेशात बाळ दत्तक दिलेली अाहेत. त्या सर्व बालकांच्या पालकांशी मोबाइल ई-मेलद्वारे संपर्क साधावा. त्यांच्याकडे खरंच बाळ अाहेत काय? याबाबत त्वरित पडताळणी करण्यात यावी, असे आदेश महिला बालविकास विभागाचे उपायुक्त बी.टी.पोखरकर यांनी शुक्रवारी दिले.
टाटिया शिशुगृहाच्या तपासणीसाठी बालविकास विभागाचे उपायुक्त बी.टी.पोखरकर हे शुक्रवारी दुपारी १२ वाजता गेले होते. मात्र, तेथे बसून तपासणी करण्यास योग्य वातावरण नव्हते. प्रचंड उकाडा हाेत असल्याने ते शिशुगृहाचे रेकॉर्ड घेऊन जिल्हा महिला बालविकास अधिकारी रमेश काटकर यांच्या कार्यालयात आले. तेथे दिवसभर त्यांनी टाटिया शिशुगृहाचे रेकॉर्ड तपासले. त्या रेकॉर्डमधील नोंदीही ते घेत होते. बाळ दत्तक देण्याबाबत नियम बदललेले आहेत. त्या नियमांचाही त्यांनी अभ्यास केला.

वयानुसार प्राधान्यक्रम नाही
काराच्यानियमानुसार बाळ दत्तक देताना ते बाळ बालकल्याण समितीकडून दत्तक देण्यासाठी फ्री करावे लागते. शिशुगृहाने या समितीकडून बालके दत्तक देण्यासाठी फ्री करून घेतली नाहीत. काराने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार वयानुसार बाळ दत्तक देण्यात येते. मात्र, शिशुगृहाने बालके दत्तक देण्यासाठी वयानुसार प्राधान्य क्रमाने बालके दत्तक दिले नसल्याचे आढळले आहे.

एकूण ८२ बाळ दत्तक
शिशुगृहातून जळगाव जिल्ह्यात, जिल्ह्याबाहेर विदेशात एकूण ८२ बाळ दत्तक दिले अाहेत. बाळ दत्तक देण्यासाठी शिशुगृहाने काराच्या इतर नियमांचे पालन केले आहे काय? याबाबतही त्यांनी प्रकरणनिहाय तपासणी केली. कोणकोणत्या नियमांचा अटींचा भंग शिशुगृहाकडून झालेला आहे? याबाबतचा अहवाल उपायुक्तांनी तयार केला अाहे.

दत्तक दिलेल्या पालकांकडे भेटी
शिशुगृहानेजळगाव जिल्ह्यात बालके दत्तक दिलेल्या पालकांकडे महिला बालकल्याण विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गृहभेटी देण्यात येणार आहेत. शिशुगृहाने ज्या व्यक्तींना बालके दत्तक दिलेली आहेत. त्यांच्याकडे ती बालके आहेत काय? याबाबत देखील पडताळणी करण्यात येणार आहे. शिशुगृहाने जळगाव जिल्ह्याबरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांबरोबर विदेशातही बालके दत्तक दिलेली आहेत. या पालकांशी मोबाइलद्वारे ई-मेलद्वारे महिला बालविकास विभाग संपर्क साधणार आहे.

बातम्या आणखी आहेत...