आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Verse Festival In Jalgaon, Latest News In Divya Marathi

वर्सी महोत्सवात हजारो भक्तांची मांदियाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जयबाबा गेलाराम साहेब... या जयघोषात हजारो भक्तांची मांदियाळी शहरातील सिंधी कॉलनी परिसरात जमली आहे. निमित्त आहे सिंधी बांधवाच्या वर्सी महोत्सवाचे. तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक उत्सवात देशभरातील सिंधी बांधव सहभागी झाले आहेत. शनिवारी गुरुग्रंथपठण अखंड पाठाने वर्सी महोत्सवास सुरुवात झाली. अमर शहीद संत कंवराम ट्रस्ट, सिंधी पंचायतीतर्फे आयोजन केले आहे.
भजनसंध्येनेआणले चैतन्य
सकाळीसंतबाबा हरदासराम बाबा गेलाराम साहेब यांची देवरी साहेबला पंचामृत स्नान करून सुरुवात झाली. लेखराज आर्य यांच्या मंत्रोच्चाराने शांतीयज्ञ झाला. यात शेकडो विवाहित जोडप्यांनी सहभाग घेतला. भाविकांसाठी सुविधा कार्यालयाचे उद््घाटनही झाले. रात्री संत बाबा हरदासराम पटापटी टोली यांच्यातर्फे भजनाचा कार्यक्रम झाला. झुलणसेवा समिती म्युझिक पार्टी इटारसी, तुलसीदार आहुजा छमाछम पार्टी, संत बाबा हरदासराम हिंदी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. संत बाबा हरदासराम यांच्या जीवनावरील भजनसंध्याने चैतन्य आणले.
आज भजनभाव अखंड कीर्तन
महोत्सवाच्यादुसऱ्या दिवशी भजन भाव अखंड कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. यासह सायंकाळी सोनू चौधरी नृत्य नाटिका म्युझिक पार्टीतर्फे विविध गीतगायनाचा कार्यक्रम होणार आहे. यासह "बाबल प्यारो जलगाव वारो' ही नाटिकाही सादर केली जाणार आहे. आकर्षक हास्य कार्यक्रम हा मनोरंजनाचाही कार्यक्रम रात्री होणार आहे.
सेवाभावींचा उत्सव
अंध,अपंगांच्यासेवेसह मिळेल ते काम करून अधिक वेळ सेवेमध्ये घालवण्यासाठी समाजबांधवांचा प्रयत्न दिसून आला. संत गेलाराम बाबा यांच्या आदर्शाप्रमाणे कार्य करून जीवन सार्थकी लावण्याचा हा उत्सव असल्याचेही समाजबांधवांनी सांगितले. महिला, ज्येष्ठाच्या सेवेसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. यात तरुण सेवेकरी नेमले आहेत.
संत कंवररामनगरात उभारण्यात आलेल्या भव्य शामियानात भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. यानिमित्त परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. झुले, शेकडो खेळण्यांची दुकाने थाटली आहेत. देशभरातील लखनऊ, धनबाद, रायबरेली, रायपूर, अहमदाबाद, हरिद्वारसह विविध भागातून समाजबांधव सहभागी झाले आहेत. या भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, निवासासह भोजनाची चोख व्यवस्था ठेवली आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवारी शहरातील सिंधी बांधवांची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.