आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Dengerous Seven Kilometer Road Go Through City

शहरातून जाणारा सात किलोमीटरचा ‘महा’सापळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भराव नसल्याने धोकादायक बनलेल्या साइडपट्टीमुळे शनिवारी मोंढाळा (ता.भुसावळ) येथील महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर रविवारी ‘दिव्य मराठी’ने शहरातील खोटेनगर ते कालिंकामाता मंदिर या 7.2 किलोमीटर रस्त्याचे सर्वेक्षण केले. या अंतरात निम्म्यापेक्षा अधिक भागात साइडपट्टय़ा धोकादायक स्थितीत आढळून आल्या. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंची स्थिती सारखीच दिसून आली. याआधी साइडपट्टय़ांवर टाकलेला मुरूम इतरत्र पसरल्यामुळे रस्त्याच्या कडा 6 ते 8 इंच उंच आणि टोकदार बनल्या असून, त्यावरून दुचाकीची चाके घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावरून जाताना किंवा रस्ता ओलांडताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. प्रशासन मात्र याबाबत ढिम्मच आहे.
जीव मुठीत घेऊन करतात ये-जा
शहरातून जाणार्‍या महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात रहिवासी परिसर आहे. रामानंदनगर, शिव कॉलनी, पिंप्राळा, वाघनगर, खोटेनगर, कोल्हेनगर, मू.जे.महाविद्यालय, आदश्रनगर, गणपतीनगर ऑटोनगर आदी भागात राहणार्‍या नागरिकांना दररोज महामार्ग ओलांडून शहरात यावे-जावे लागते. तसेच एकदा रस्त्याखाली उतरलेले वाहन पुन्हा रस्त्यावर आणणे या भागात अत्यंत कठीण झालेले आहे.
अशा असाव्या साइडपट्टय़ा
0 महामार्गावर दोन्ही बाजूने कमीत कमी चार-ते पाच फूट रुंदीची साइडपट्टी असावी.
0 डांबर आणि खडीपासून रस्त्याप्रमाणेच साइडपट्टी तयार केलेली असावी.
0 साइडपट्टीचे शेवटचे टोक उताराने रस्त्याच्या खाली संपवावे; जेणेकरून त्याला कडा राहणार नाही.
या आहेत धोकादायक जागा
खोटेनगर ते गुजराल पेट्रोलपंप : पेट्रोल पंपासमोर चौफुलीच्या दोन्ही बाजूस गतिरोधक आहेत; मात्र या गतिरोधकांची उंची अधिक असल्यामुळे तेथे दुचाकीस्वारांचा तोल जातो. त्याच ठिकाणी साइडपट्टय़ांवर मोठे खड्डे पडलेले आहेत.
जिल्हा परिषद कॉलनी : या कॉलनीतून एक कच्च्या रस्ता महामार्गाला जोडला जातो. तेथून वाहने महामार्गावर येण्याच्या जागी उंचवटा तयार झाला आहे. त्यामुळे अनेकदा दुचाकीस्वार येथे कोसळतात.