आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Soon Ash Water Recovery In Deep Nagar Plant

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह - दीपनगर वीज प्रकल्पात १२ हजार कोटी लिटर्स पाण्याचा पुनर्वापर होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात महाजनकोतर्फे ‘अॅश वॉटर रिकव्हरी’ योजना राबवण्यात येत आहे. वीजनिर्मिती प्रक्रियेनंतर निघणारी राख पॉडपर्यंत वहन करण्यासाठी दररोज तब्बल १२ हजार क्युबिक मीटर (१२ हजार कोटी लिटर्स) पाण्याचा वापर होतो. हेच पाणी या योजनेंतर्गत पुनर्प्रक्रिया करून वापरले जाणार आहे.

औष्णिक केंद्रातील चारही संचांची स्थापित क्षमता हजार ४२० मेगावॅट आहे. त्यासाठी दररोज किमान १५ हजार मेट्रिक टन क़ोळसा जाळला जातो. तसेच दररोज वीजनिर्मितीनंतर तब्बल हजार मेट्रिक टन राख निघते. ही राख १४ किलोमीटर अंतरावरील वेल्हाळे अॅश पॉडमध्ये पाण्याचा दाब देऊन पाइपलाइनद्वारे वाहून नेली जाते. त्यासाठी दररोज १२ हजार क्युबिक मीटर पाणी लागते. पॉडमध्ये राख साचल्यानंतर हे पाणी वाया जाते.

हे राखमिश्रित पाणी वेल्हाळे तलाव आणि शेती शिवारात शिरत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी औष्णिक वीजनिर्मिती प्रशासनाने ‘अॅश वॉटर रिकव्हरी योजना’ हाती घेतली आहे. त्यासाठी लागणारी पाइपलाइन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.
पाण्याचा पुनर्वापर व्हावा, या उद्देशाने ही ‘अॅश वॉटर रिकव्हरी’ योजना राबवली जात आहे. प्रकल्पातील सर्व अभियंत्यांच्या मदतीने हे काम प्रगतिपथावर आहे. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची बचत होण्यास मदत होईल. एल.बी.चौधरी,उपमुख्यअभियंता, वीजनिर्मिती केंद्र

दीपनगर प्रकल्पातील स्थापत्य विभागातील ५० पेक्षा अधिक अभियंते या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी राबत आहेत. ही योजना यशस्वी झाल्यास एक पॅटर्न म्हणून ती राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये आगामी काळात राबवली जाऊ शकते.

छत्तीसगडमधील भिलाई नजीकच्या पुरेना येथील २५० मेगावॅटच्या दोन संचांसाठी भेल आणि एसएसपीसीएल (एनटीपीसी-सेल पॉवर कंपनी प्रा. लि.) या कंपन्यांनी ही योजना राबवली आहे.
वेल्हाळे पॉडमध्ये राख सोडल्यानंतर पाणी वेगळे करून ते एका िवंधन विहिरीत साठवले जाईल. उच्च शक्तीच्या पंपाद्वारे हे पाणी पुन्हा १४ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनद्वारे प्रकल्पात आणले जाईल. हेच पाणी पुन्हा पॉडपर्यंत राख वाहून नेण्यासाठी वापरण्यात येईल.

या योजनेचा प्रस्ताव महाजनकोच्या प्रकाशगड मुख्यालयाने मंजूर करून त्यासाठी ११ कोटी ४३ लाख निधीची तरतूद केली आहे. पाइपलाइनचे काम अंतिम टप्प्यात आहे. पंपिंग हाऊस, जॅकवेलही उभारणी होईल.