आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Soon Decision Will Be Taken Of Increasing Milk Rate

दुधाच्या दरवाढीचा निर्णय लवकर घेणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड- दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांचा चारा आणि संगोपन अवघड झाले आहे. शेतकर्‍यांना मिळणारा दुधाचा दर अपुरा असून सोमवारी मुंबईत होणार्‍या बैठकीत दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय लवरकच घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

जामखेडजवळ असलेल्या जनावरांच्या छावणीला त्यांनी रविवारी भेट दिली. त्यावेळी शेतकर्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यानंतर जामखेडला पाणीपुरवठा करणार्‍या भुतवडा तलावाच्या गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी भुतवडा तलावाच्या कामांची पाहणी केली. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यादव खताळ यांच्याकडून त्यांनी तलावातील गाळाची माहिती जाणून घेतली. भुतवडा जोड तलावाच्या अपूर्ण कामाची माहिती घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री बबनराव पाचपुते, विक्रमसिंह पाचपुते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, शारदा भोरे, उपसभापती दीपक पाटील, सुरेश भोसले, डॉ.भास्कर मोरे, सरपंच कैलास माने, माजी सभापती डॉ. पी. जी. गदादे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. मधुकर राळेभात, संजय वराट, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल गुप्ता, प्रांताधिकारी संदीप काकडे, तहसीलदार विजय कुलांगे आदी उपस्थित होते. प्रारंभी उपमुख्यमंत्री पवार यांनी डोणगाव येथे जनावरांच्या छावणीला भेट दिली. त्यानंतर अरणगाव येथे रोजगार हमी योजनेच्या कामांना भेट दिली. जामखेड येथील जनावरांच्या छावणीवर उसाच्या बगॅसपासून पशुखाद्य बनवण्याचे प्रात्यक्षिक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी दाखवले. मंत्री पवार यांच्या हस्ते यूपीएसएसी परीक्षा उत्तीर्ण झालेले जामखेडचे तहसीलदार विजय कुलांगे यांचा येथे सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत शासन जनतेसोबत आहे. पाणी, रोहयो माध्यमातून लोकांना काम देऊन छावण्यामार्फत पशुधन जगवण्याचे काम केले. शरद पवार यांच्या माध्यमातून आठवड्याला चार किलो पशुखाद्य जनावरांना मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांत 60 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.