आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार साेडल्यानंतर फायलींचा निपटारा, कुलगुरूंनी बंगल्यावर मागवल्या फाइल्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी बुधवारी सायंकाळी कुलगुरू पदाचा पदभार सोडला. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत त्यांनी फायलींवर सह्या केल्या. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर त्यांनी निवासस्थानी फायली मागवल्या होत्या.
डॉ. मेश्राम यांचा कार्यगौरव सोहळा बुधवारी विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे दुपारी वाजेपर्यंत अधिकारी, कर्मचारी सर्वच जण कार्यक्रमात व्यग्र होते. त्यानंतर सायंकाळी त्यांनी पदभार सोडला. तर प्रभारी कुलगुरू म्हणून एकनाथ डवले यांनी पदभार घेतला. याची विद्यापीठातर्फे माहिती देण्यात आली आहे. तसेच पदभार सोडल्यानंतर डॉ. सुधीर मेश्राम यांनी निवासस्थानी फायली मागवून त्यावर सह्या करून मंजुरी दिली. या बाबत विद्यापीठात उलटसुलट चर्चा सुरू होती. दरम्यान, फायलींचा निपटारा केला. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास कुलगरू मेश्राम रेल्वेने नागपूरकडे रवाना झाले.
बातम्या आणखी आहेत...