आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरूंनी बंगल्यावर फाइल्स मागवल्या नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुधीर मेश्राम यांचा कार्यकाळ सप्टेंबर राेजी संपला. त्यानंतर त्यांनी बंगल्यावर फायली मागवल्या नाहीत, असा दावा विद्यापीठाने केला अाहे. डाॅ. मेश्राम यांनी कार्यकाळ संपण्याच्या दाेन-तीन दिवस आधीच अापल्याकडे कार्यालयीन फायली स्वाक्षरीसाठी अाणू नये, अशी सूचना कार्यालयातील कर्मचाऱ्यांना केली हाेती. कुलगुरू कार्यालयात अालेल्या सर्व फायलींचे नाेंद संगणकावर करण्याची पद्धत पाच वर्षांपासून सुरू अाहे. त्यामुळे काेणत्याही फायली पदभार साेडल्यानंतर बंगल्यावर मागवल्या नाहीत, अशी माहिती विद्यापीठाने कळवली अाहे.
बातम्या आणखी आहेत...