आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice Chancellors Whatsapp Group Created In State, Tawde Notice Followed

राज्यातील कुलगुरूंचा व्हाॅट‌्सअॅप ग्रुप तयार, विनोद तावडे यांच्या सूचनेवर कार्यवाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विद्यापीठांच्या संदर्भात होणा-या विविध बैठकांच्या माहितीचे आदान- प्रदान करण्यासाठी राज्यातील सर्व कुलगुरूंचा व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करा. मुंबईत होणा-या बैठकांसाठी विद्यापीठातून एखाद्या अधिका-यांची समन्वयक म्हणून निवड करा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सर्व कुलगुरूंना दिल्या अाहेत. त्यानुसार राज्यभरातील कुलगुरूंनी व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केला आहे.

राजभवनातील ‘जेबीव्हीसी’ची (जॉइंट बोर्ड ऑफ व्हाइस चान्सलर) बैठक वगळता कुलगुरूंनी मुंबईत यापुढे कुठल्याही बैठकांना मुंबईत हजर राहणे आवश्यक नाही. समन्वयकांना पाठविले तरी चालेल. सर्व कुलगुरूंनी व्हॉट्सअॅप ग्रुपवरून संपर्कात राहावे अशा सूचना तावडे यांनी दिल्या आहेत, अशी माहिती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.डॉ. ए.एम.महाजन यांनी दिली. ६ जुलै रोजी तावडे यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीला डॉ. महाजन उपस्थित होते. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. कुलगुरूंचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्यांनी संशोधन आणि उच्चशिक्षणातील गुणवत्तेसाठी अधिक वेळ विद्यापीठातच राहावे, असे विचार तावडे यांनी व्यक्त
केले आहे.

संचालकांच्या भेटी
पुणे येथील उच्च शिक्षण संचालक सर्व विद्यापीठांचे कुलसचिव व सह संचालकांची बैठक घेण्यात आहेत. यात विद्यापीठांच्या अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या शिवाय काही विद्यापीठांना संचालक स्वत: भेटी देऊन आढावा घेणार आहेत.
निर्णयचा विद्यापीठांना फायदा
मुंबईत झालेल्या बैठकीनुसार सर्व कुलगुरूंचा व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठांना शिक्षण संचालक भेटी देणार आहेत. यात घेण्यात येणा-या निर्णयाचा फायदा विद्यापीठांना होणार आहे.
डॉ.ए.एम.महाजन, कुलसचिव, उमवि

३०० कोटींचे पॅकज
केंद्राच्या रुसा (राष्ट्रीय उच्चशिक्षा अभियान) अंतर्गत देशातील ‘ए’ ग्रेडप्राप्त विद्यापीठ आणि महाविद्यालयांना ३०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. त्या संदर्भात येणा-या काळात विद्यापीठांची निवड करून योग्य त्या संशोधनासाठी निधी दिला जाईल.