आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीडित शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीला जळगावकर सरसावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- साने गुरुजी कॉलनीतील बापूसाहेब खैरनार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दरमहा ५०० रुपये देण्याचे जाहीर केले. त्या पाठोपाठ शनिवारी खैरनार यांच्या समाजातील तीन जणांनी पुढाकार घेऊन त्यांनीही दरमहा ५०० रुपयांची मदत देण्यात जाहीर केले.

पाऊस नसल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ होत आहे. हे चित्र पाहून एमएसईबीतून सेवानिवृत्त झालेल्या खैरनारांनी सामाजिक जाण ठेवत मदत देण्याचे जाहीर केले होत. त्यांच्या या कार्याला बळ मिळावे म्हणून दुसऱ्याच दिवशी त्यांच्या समाजातील तीन जणांनीही मदत जाहीर केली. यात विनोबानगरात राहणारे रघुनाथ पांडुरंग कोल्हटकर यांचा समावेश आहे. कोल्हटकर हे सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते एका वर्षासाठी दरमहा ५०० रुपये देणार आहे. तसेच विवेक कॉलनीत राहणारे गोपाळ कापडणे हे देखील दरमहा ५०० रुपये देणार आहेत. कापडणे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. दादावाडी परिसरात राहणारे किशोर सोनवणे यांनीही ५०० रुपये महिना देण्याचे कबूल केले आहे. सोनवणे हे शिवणकाम व्यवसाय करतात. शिंपी समाजातील आणखी काही नागरिक या अभियानात सहभागी होणार आहेत.

अनेकांकडूनकौतुक, चौकशी
खैरनारयांनी मदत जाहीर केल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने शनिवारी प्रसिद्ध केले. त्यामुळे अनेक जणांनी खैरनार यांना फोन करून त्यांचे कौतुक केले. तर बऱ्याच जणांनी मदत करण्यासाठीही चौकशी केली. येणाऱ्या काळात समाजातील सुमारे २५-३० जण या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे खैरनार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

आज करणार एक हजार रुपयांची मदत
रविवारीभरारी फाउंडेशनतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांतील २३ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमात खैरनार कापडणे हे दोघे मिळून एक हजार रुपये मदत देणार आहेत. या मदतीपासूनच त्यांच्याही उपक्रमाची सुरुवात होत आहे.