आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidhasabha Election,latest News In Divya Marathi

मतदारसंघातच अडकवून खडसेंची कोंडी करण्याचा डाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्या 25 वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात हुकमी एक्का म्हणून स्थान मिळवलेले एकनाथ खडसेंना यंदाची निवडणूक पूर्वीसारखी सोपी राहिलेली नाही. याला कारण म्हणजे राज्यात तुटलेली युती मानली जातेय. कारण विरोधी पक्षनेते म्हणून खडसेंनी युतीच्या संदर्भात उद्धव ठाकरेंना फोन करून दिलेला निरोप भुसावळच्या जागेसाठी केलेला आग्रह हे कारण युती तुटण्याचे मानले जात आहे. त्यात राज्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील संघ परिवाराच्या सदस्यांनाही हिंदू मतांचे विभाजन होण्याचा विषय पचनी पडलेला नाही. त्यामुळे खडसेंना आपल्याच घरातून नाराजीचा सामना करावा लागणार आहे.
एकंदर खडसेंकडूनआतापर्यंत दुखावलेले गेलेले अनेक ज्ञात-अज्ञात लोक या निवडणुकीत सक्रिय झाल्याचेही बोलले जातेय. त्यामुळे खडसेंना आपल्याच पक्षाच्या अन्य उमेदवारांच्या प्रचाराला पुरेसा वेळ देता येणार नाही. जणू तशी परिस्थिती तयार केली जात असल्याचा जाणकारांचे म्हणणे आहे. ग्रेसतर्फे योगेंद्रसिंगपाटील यांना उमेदवारी दिल्याने ते काँग्रेसचे पारंपरिक मते मिळवतील. तर मनसेनेही तालुकाध्यक्ष राजेंद्र सांगळकर यांना उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत खडसेंना यंदा पंचरंगी लढतीत मतदारांना गृहित धरणे अडचणीचे ठरू शकते अशी परिस्थिती आहे. ष्ट्रवादीकडून ऐनवेळीमाजी आमदार अरुण पाटील यांना पुढे करण्यात आले. भाजपतून बाहेर पडण्यास खडसे जबाबदार असल्याची भावना अरुण पाटील यांच्या समर्थकांची आहे. रावेर तालुक्यातील काही गावे मुक्ताईनगराला जाेडली गेलेली आहेत. त्यामुळे पाटील यांचा त्या भागातील मतदारांवर बऱ्याच अंशी प्रभाव मानला जातो. णत्याही परिस्थितीतखडसेंना रोखण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जात आहे. याचसाठी स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुक्ताईनगरला जाहीर सभा घेणार असल्याचेही सांगितले जातेय.शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुखचंद्रकांत पाटील यांची उमेदवारी म्हणजे पहिल्यांदाच शिवसेनेला मिळालेली संधी मानली जातेय.
राज्यातील भाजप शिवसेनेची युती तुटण्याला कारणीभूत मानले जाणारे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची राजकीय कोंडी करण्याचा डाव विरोधकांकडून रचला जातोय. खडसेंना यंदा कोणत्याही परिस्थितीत विजयापासून रोखण्यासाठी थेट ‘मातोश्री’पासून फिल्डिंग लावण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचेही नियोजन सुरू आहे.

निवडणुकीचे वर्ष खडसेंचे मताधिक्य
१९९० २६६२मतांचा फरक
१९९५ ७५५९मतांचा फरक
१९९९२ ०५६मतांचा फरक
२००४ ८३०मतांचा फरक
२००९ ८३३९मतांचा फरक