आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidyarthininna Crash Metedoara Giving The Crowd Phodali

विद्यार्थिनींना धडक देणारी मेटॅडोअर जमावाने फोडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-महाविद्यालयात दुचाकीने जात असलेल्या दोन विद्यार्थिनींना शनिवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास आयटीआय समोरील महामार्गावर मेटॅडोअरने धडक दिली. यात अश्विनी राजेंद्र खडके या विद्यार्थिनीचा उजवा पाय फ्रॅर झाला. दरम्यान, संतप्त जमावाने मॅटेडोअरच्या काचा फोडल्या.

केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अश्विनी आणि दीपाली हिरालाल शिरसाठ या दोघी दुपारी 1 वाजता महाविद्यालयात जात होत्या; तर मेटॅडोअर (क्रमांक एमएच-20, डब्ल्यू-6681) औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीतून पाळधीला एसी घेऊन येत होता. महामार्गावर आयटीआयसमोर विद्यार्थिनीच्या दुचाकीला मेटॅडोअरने मागून जोरदार धडक दिल्याने त्या दोघी रस्त्यावर पडल्या. यात अश्विनीचा उजवा पाय फ्रॅर झाला तर दीपालीला किरकोळ दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती कळल्यानंतर दोघा मुलीचे नातेवाईक योगेश खडके, नितीन भोई अपघातस्थळी आले. या दोघांसह जमावाने मेटॅडोअरच्या काचा फोडल्या. यावेळी मेटॅडोअरचालक शेख अनिस फरार झाला होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी गणपती हॉस्पिटलमध्ये तर दीपालीला भोळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
एसींची तोडफोड

जमावाने केलेल्या दगडफेकीत मेटॅडोअरमध्ये असलेल्या एसींचीही तोड-फोड झाली आहे. या प्रकरणी चालक शेख याच्या फिर्यादीवरूनही रामानंदनगर पोलिस ठाण्यात नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.