आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार विजय दर्डा यांना पत्नीशोक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- खासदार विजय दर्डा यांची पत्नी तथा आमदार सुरेश जैन यांच्या धाकट्या भगिनी ज्योत्स्ना (61) यांचे शनिवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर यवतमाळ येथे रविवारी सायंकाळी दर्डा उद्यान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात खासदार विजय दर्डा, पुत्र देवेंद्र, स्नुषा रचना, कन्या पूर्वा, दीर राजेंद्र दर्डा असा परिवार आहे. गेल्या 24 वर्षांपासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. त्यांना 5 मार्च रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.