आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय काबरा यांच्या पत्नीची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय काबरा यांच्या पत्नी संध्या काबरा (वय 53) यांनी शुक्रवारी दुपारी रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सागर पार्क जवळील विद्यानगरातील रहिवाशी संध्या काबरा या दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास स्वामी सर्मथ केंद्रात जात असल्याचे सांगून घरून निघाल्या. सायंकाळी 7पर्यंत त्यांच्या संदर्भात घरच्यांना माहिती मिळाली नव्हती. त्यांचा मृतदेह पिंप्राळा रेल्वेगेट ते पुलादरम्यान आढळून आला. याबाबत सुरुवातीला अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद रेल्वे पोलिसात करण्यात आली होती. त्यानंतर त्या व्यापारी विजय काबरा यांच्या पत्नी असल्याचे उघड झाले.