आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Patil News In Marathi, Congress, Lok Sabha Election, Divya Marathi

रावेर, जळगावची जागा कॉँग्रेससाठी अनुकूल नव्हतीच - विजय पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघ कॉँग्रेससाठी अनुकूल नव्हतेच, आमच्याकडे सक्षम उमेदवारच नसल्याने मी कॉँग्रेसला जागा सोडण्यासाठी प्रयत्न केला नसल्याचा गोप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पक्षशिस्तीचा भंग केल्याने डॉ.उल्हास पाटील यांच्यावर कारवाई करावी, यासाठी मी स्वत: मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांशी बोलणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.


पाटील यांनी मंगळवारी कॉँग्रेस भवनऐवजी आर.आर. विद्यालयात पत्रकार परिषद घेतली. ऐनवेळी डॉ.राधेश्याम चौधरी आणि संजय पाटील यांनी उपस्थिती दिली. जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्ष या वेळी उपस्थित नव्हते. आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात आपण सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. मोदीं टीमच्या तुलनेत कॉँग्रेस प्रचार आणि मार्केटिंगमध्ये कमी पडत असल्याचेही त्यांनी कबुल केले.


आयोगाने उमेदवारी करणार्‍यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून प्रत्येक घटकातील किमान 10 सूचक आणि 10 अनुमोदक मिळवणे बंधनकारक करावे, निवडणूक खर्चात 1 कोटी 20 लाख र्मयादा वाढवावी, अशी मागणी केली. याबाबत आयोगाला पत्र देणार असल्याचे ते म्हणाले.


डॉ.पाटलांवर होणार कारवाई
डॉ.उल्हास पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड.संदीप पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. काँग्रेस शिष्टमंडळाने उल्हास पाटील यांची भेट घेऊन माघारीसाठी प्रयत्न केले होते. याप्रकरणी अहवाल पक्षाला सादर केला असून पक्ष लवकर डॉ.पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.