आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Vikasa' Milk Transport Union, Latest News In Divya Marathi

वाहनचालकांचे चक्का जाम; ‘विकास’चे वितरण खोळंबले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ‘विकास’दुधाची वाहतूक करणाऱ्या चालकाच्या उपचारासाठी दूध संघाकडून मदत मिळावी, या मागणीसाठी रविवारी दूध वितरण करणाऱ्या वाहनचालकांनी काम बंद पाडले. तब्बल तीन तास वाहने दूध संघासमोर उभी होती. आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर चालकांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, या आंदोलनामुळे दुधाचे वितरण उशिरा झाले.
दूध संघातून ‘विकास’चे दूध रावेरला घेऊन जात असताना शनिवारी वाहनचालक सचिन जयकर (रा.हुडको-पिंप्राळा, जळगाव) याचा अपघात झाला. त्यात त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. त्याच्यावर शस्त्रक्रियेसाठी ८० हजारांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. मात्र, याबाबत दूध संघाने अंग झटकल्याने जयकरचा उपचार कसा करणार? असा प्रश्न दुधाची वाहतूक करणाऱ्या चालकांना पडला. त्यामुळे जोपर्यंत त्याच्या उपचारासाठी मदत िमळत नाही तोपर्यंत दूधपुरवठा करण्याचा निर्णय चालकांनी घेतला. तसेच रविवारी दुपारी दूध संघासमोर वाहने उभी करून चालकांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. त्यानंतरही दूध संघ प्रशासन भूमिकेवर ठाम होते. शेवटी ठेकेदारांनी जयकरच्या उपचारासाठी स्वत: आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चालकांनी आंदोलन मागे घेतले.
वितरणासाठी वेगवेगळे ठेकेदार
दूधसंघातून जिल्ह्यासोबतच औरंगाबाद, बुलडाणा, सटाणा आदी ठिकाणी ‘विकास’ दुधाचा पुरवठा केला जातो. या दुधाची वाहतूक करण्याचा ठेका वेगवेगळ्या ठेकेदारांना देण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून दिवसाला ८० वाहने दुधाचे वितरण करतात.
संतप्त चालकांचा युनियन स्थापण्याचा निर्णय
आजएका चालकावर हा प्रसंग ओढवला. तसेच भविष्यात अशी वेळ आपल्यावरही येऊ शकते. त्यामुळे संतप्त झालेल्या चालकांनी मदत िमळाल्याशिवाय वाहने चालवणार नाही, असा पवित्रा घेत एकजूट दाखवली. तसेच यासंदर्भात चालकांची युनियन स्थापन करण्याचा निर्णयदेखील घेतला.
उशिरा दूध वितरण
याआंदोलनामुळे दुधाच्या वितरणावर परिणाम झाला. दुपारी वाजता जाणारी वाहने वाजेपर्यंत दूध संघातच होती. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात दुधाचे वितरण उशिरा झाले. मात्र, याबाबत बोलण्यास दूध संघाच्या प्रशासनाने टाळले. दरम्यान, अपघातात जखमी जयकरची दूध संघाचे अनंत अंबिकर यांनी विचारपूस केली.