आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाेचे सचिव पुरात गेले वाहून, पाराेळा तालुक्यात मुसळधार पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंदाणे - पारोळा तालुक्यातील तामसवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता मुसळधार पाऊस झाला. नाल्याच्या पुलावरील पाण्याचा अंदाज अाल्याने निमगूळ येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव राजेंद्र दयाराम सरदार हे मोटारसायकलसह पाण्यात वाहून गेले. त्यांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सरदार हे शिंदी येथील रहिवासी असून ते निमगाव येथील नोकरीच्या गावी जाण्यासाठी निघाले होते. याबाबत कळताच तहसीलदार महेंद्र माळी, मंडळ अधिकारी नितीन पाटील, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, डी.के.पाटील (मुंदाणे) यांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान, रविवारीदेखील तामसवाडीसह मुंदाणे, सावखेडा, आडगाव, तरवाडे, देवगाव या भागात जोरदार पाऊस झाला होता.

चाळीसगाव,पाचाेऱ्यात पाऊस
पाचाेरा चाळीसगाव येथे मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. पाचाेरा, तारखेडा भागात पावसाने हजेरी लावली.
बातम्या आणखी आहेत...