आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुभाष देसाईंचा राजीनामा म्हणजे नाटकबाजी; विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील. - Divya Marathi
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील.
धुळे- शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांचा राजीनामा ही केवळ नौटंकी आहे. अशा नाटकबाजीतून ते घोटाळा लपवत राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम करतायेत अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील हे धुळे तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
 
शिरपूरहून नंदुरबारकडे रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यांनी सद्यस्थितीला राज्यात अनेक भागात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. पावसाअभावी शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सरकारकडे यावर उपाययोजना म्हणून अद्याप कोणताच अॅक्शन प्लॅन तयार नसल्याचे त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर आघाडीच्या सत्ताकाळात मोपलवार सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना बगल मिळाली होती या आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपचे खंडण करत घोटाळेबाजांनीच असे आरोप करणे ही बाब लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.  
बातम्या आणखी आहेत...