आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना ग्रामसेवक, उपनिरीक्षक अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - बांधकामपूर्ण झाल्याचा दाखला देण्यासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकास धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कृष्णा दत्तात्रय पाटील असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव असून ते ग्रामसेवक संघटनेेचे तालुकाध्यक्ष आहेत. हा प्रकार बुधवारी दुपारी टाकळी प्र.चा ग्रामपंचायतीमध्ये घडला. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे टाकळी प्र.चा येथील ग्रामपंचायत हदीत प्लॉट आहे. काही दिवसांपूर्वी या प्लॉटवर बांधकाम करण्यात आले असून बांधकामपूर्ण झाल्याचा दाखला घेण्यासाठी तक्रारदार यांनी ग्रामसेवक के.डी पाटील यांच्याकडे अर्ज केला होता. परंतु ग्रामसेवक पाटील यांनी मुळ दाखला देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १५ हजारांची लाच मागितली. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ही मािहती धुळे लाचलुचपत विभागाला दिली. या तक्रारीची पडताळणी करत लाचलुचपत विभागाने बुधवारी टाकळी प्र.चा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ग्रामसेवक कृष्णा पाटील हे १५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ आढळून आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या कारवाईत धुळे लाचलुचपत विभागाचे पोलिस अिधक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक देशपांडे, पोलिस उपअिधक्षक सुनिल गागुंर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर,प्रविण अमृतकार,जितेंद्र परदेशी, संदीप पाटील, किरण साळी, पोना प्रकाश सोनार, सुधिर सोनवणे संदीप सरग आदींनी सहभाग नोंदविला.
शिंदखेडा पोलिस ठाण्यात मागितले 7 हजार रुपये

प्रतिनिधी | धुळे
ट्रकचापत्रा फाडून त्यातील मालाच्या चाेरीबाबतची तक्रार नाेंदवून घेण्यासाठी ट्रकचालकाकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिंदखेडा पाेलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. अाधार भाईदास अहिरे असे या उपनिरीक्षकाचे नाव अाहे.

तक्रारदार हा भिवंडी येथून काला हिट, गुडनाइट माॅस्क्युटाे कार्टेज इतर माल घेऊन इंदूरकडे जात असताना बाभळदे फाटा (ता.शिंदखेडा) येथे ट्रकला अपघात झाला. त्या वेळी ट्रकचा पत्रा फाटून त्यातील माल खाली पडला. हा माल अज्ञात लाेकांनी चाेरून नेला. याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी ट्रकचालक शिंदखेडा पाेलिस स्टेशनला गेला असताना तेथे पाेलिस उपनिरीक्षक अाधार अहिरे याची भेट घेऊन त्याला घटना सांगून तक्रार नाेंदवून घेत पंचनामा करण्यास सांगितले तेव्हा अाधार अहिरे याने तक्रारदाराकडे मालट्रकची कागदपत्रे, विमा पावती परमिट मागून घेत तक्रार दाखल करण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने ट्रकचालकाने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करताना अाधार अहिरे याने तडजाेडीअंती सात हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने बुधवारी चिमठाणे पाेलिस दूरक्षेत्र येथे सापळा लावून तक्रारदाराकडून सात हजारांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात अाले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक पी.पी.देसले, त्यांच्या पथकातील हेडकाॅन्स्टेबल दिलीप खाेंडे, देवेंद्र वेंद्रे, कैलास शिरसाठ, संताेष हिरे यांनी केली. याबाबत शिंदखेडा पाेलिस स्टेशनला गुन्हा नाेंदविण्याची प्रक्रिया सुरू हाेती.
बातम्या आणखी आहेत...