आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरेशा तलाठय़ांअभावी अडतोय गावगाडा..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - तलाठय़ांच्या कमतरतेमुळे सध्या दुष्काळसदृश परिस्थितीत गावगाड्यावर चांगलाच परिणाम झाला आहे. नागरिकांची दाखले, उतार्‍यांसाठी मोठी पंचाईत झाली आहे. अतिरिक्त कार्यभाराच्या नावाने मात्र नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. याबाबत विविध गावातील सरपंचांच्याही तक्रारीही वाढल्या आहेत.


तळागाळापर्यंत न पोहचणार्‍या तलाठी (सारथी)ची कमतरता वाढली तर यंदाच्या दुष्काळात तेराव्या महिन्याचीच भर पडल्याचे चित्र तालुक्यात आहे. सध्या भीषण दुष्काळाचे सावट तालुक्यावर असताना पाणीटंचाई , वाळूचोरी, टँकर मागणी याबाबतच्या स्वतंत्र यंत्रणेवरदेखील तलाठी नजर ठेवत शासनापर्यंत अहवाल पाठवत असतो. आणेवारी, पीकपेरा, पिकांचे नुकसान, पाऊस, घटना, दुर्घटना आदींच्या पंचनाम्यांचे काम तलाठीच करतात. मात्र सध्या कमतरतेमुळे सातबारा उतारे, खाते नोंदी, रहिवाशी दाखले, फेरफार नोंदी, खरेदी नोंदी आदी कामांसाठी तलाठय़ांची शोधाशोध करावी लागते.


एका तलाठय़ाकडे अनेक गावांचा अतिरिक्त पदभार असल्याने तलाठी एकाच गावात आढळत नाहीत. आज तलाठी नेमक्या कोणत्या गावी सापडतील याची खात्री नसते. ग्रामस्थ तहसील कार्यालयात फेर्‍या मारतात. मात्र तलाठीअप्पा शोधूनही सापडत नाही. गावकर्‍यांची फेरीही वाया जाते. वेळ अन् पैसाही जातो.


अप्पांचा मोबाइलही नॉट रिचेबल
तलाठीअप्पांनी मोबाइल नंबर नागरिकांना दिलेला असतो. मात्र नागरिकांचे काम असते, तेव्हा नेमका मोबाइल कधी नॉट रिचेबल तर कधी स्वीच ऑफ दाखवतो. मग मात्र नागरिकांचा संताप अनावर होतो. कोतवाल मंडळीही तहसील कार्यालयाच्या आवारात दिसतात पण अप्पा कुठे याचा थांगपत्ताही त्यांना नसतो.

नुकत्याच दोन दिवसांपूर्वी तलाठय़ांच्या बदल्या झाल्या आहेत. तालुका कार्यालयात 11 सज्यांमधून 13 तलाठय़ांच्या जागा रिक्त आहेत. ही बाब वरिष्ठ पातळीवरची असून कामकाजावर खरोखर परिणाम होत आहे. जोपर्यंत जागा पूर्ण होत नाही तोपर्यंत मात्र कसरतच आहे. प्रमोद हिले , तहसीलदार अमळनेर