आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायकचा खून केल्याची मोबाइलवर कबुली, खून खटल्यात अमरचा मित्र मयूर महाजनची साक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नगरसेवक विनायक सोनवणे खून खटल्यात मंगळवारी २४व्या क्रमांकाचा साक्षीदार मयूर महाजन याची साक्ष झाली. सोनवणे यांच्या खुनात संशयित असलेल्या अमर सोनवणेचा तो मित्र होता.

अमरने घटनेच्या दिवशी दुपारी १.३० वाजता मयूरच्या मोबाइलवर फोन करून आपण विनायक सोनवणे यांचा खून केला असल्याची माहिती दिली होती. तशी साक्ष मयूरने न्यायालयात दिली आहे. मयूर आणि अमर एकाच कॉलनीत राहत होते, तसेच ते मित्र असल्यामुळे घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे ते सकाळी वाजता भेटले होते, त्यानंतर १० वाजता अमर तेथून निघून गेला. १.३० वाजेच्या सुमारास पुन्हा धावत-पळत घरी आला. घरून निघाल्यानंतर खुशाल नावाच्या मित्राच्या दुचाकीने घरापासून काही अंतरावर पुढे गेला. तेथून मयूरला फोन करून खुनाची माहिती दिली. मयूूरने खरोखर असे केले का? असे विचारल्यानंतर अमरने हो सांगितले होते.
अशी साक्ष मयूरने दिली आहे. दरम्यान, त्याची उलट तपासणीही झाली. तो संशयित पवन सूर्यवंशीचा मित्र असून त्याला भेटायला कारागृहात गेला असता तेथे पवनने त्याला धमकावले होते. या प्रश्नांचे मयूरने नकारात्मक उत्तरे दिली.