आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढचा आठवडा स्टार प्रचारकांचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला केवळ दहा दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या टप्प्यात प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांतील मुलुख मैदान तोफा जिल्ह्यात धडकणार असून सोबत सिनेकलावंत व युवा नेतृत्व देखील मतदारांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे पुढचा आठवडा हा स्टारप्रचारकांचाच राहणार आहे.

भारतीय जनता पक्षांतर्फे ५ रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची दुपारी ३ वाजता जयप्रकाश नारायण चौकात सभा होणार आहे. ७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एरंडोल येथे दुपारी २ वाजता म्हसावद रोडवर जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ८ रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, खासदार हेमा मालिनी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची सभा होणार आहे. १० रोजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची चाळीसगाव व जळगाव येथे सभा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिली. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ५ रोजी जिल्ह्यात येणार आहेत. सकाळी ८ वाजता राजवड (ता. पारोळा )येथे येतील. ९.४५ वाजता अमळनेर, एरंडोल आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी संयुक्त प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे देखील ९ रोजी जळगावात येत आहेत. सकाळी ११ वाजता शिवसेना कार्यालयापासून रोड शो चे आयोजन केले आहे.
टॉवर चौक, चित्रा चौक, शिवतिर्थ मैदान तसेच खान्देश सेंट्रल येथे समारोप होईल त्यांनतर शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती महानगरप्रमुख कुलभुषण पाटील यांनी दिली.