आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेंग्यूने पाय पसरले, "फ्लू'चा विळखा वाढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आठवडाभरापासूनपावसाने सातत्य ठेवताच डेंग्यू थंडी तापाचे लक्षण असलेल्या फ्लूचा विळखा वाढायला सुरुवात झाली आहे. आठ दिवसात शहरातील फिजिशियनकडील ओपीडीत दुपटीने वाढ झाली आहे. तर पॅथॉलॉजीस्टकडे डेंग्यूच्या चाचण्या पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली आहे. प्लेटलेट कमी झाल्यास रुग्णांच्या नातलगांना व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
उशिरा आगमन झालेल्या पावसाने गेल्या १५ दिवसांत चांगलाच धडाका लावला आहे. जिल्हाभरात बरसलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन नियमित दिनचर्येवरदेखील परिणाम झाल्याचे दिसते. यात वृद्धांसह लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला तापाचे प्रमाण वाढले आहे. उपचारासाठी जाणा-या रुग्णांना व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. "फ्लू'ची लक्षणे असलेली असंख्य रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून मलेरियाचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत आता वाढायला सुरुवात झाली आहे.
डेंग्यूचे प्रमाण वाढले
गेल्या१० ते १५ दिवसांत व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसते. आमच्याकडेही डेंग्यू पॉझिटिव्हचे नमुने निष्पन्न झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण नक्कीच वाढले आहे. डॉ. पी.एन.पाटील, पॅथॉलॉजीस्‍ट