आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार्यकर्त्यांनो, गेल्या विधानसभेतील पराभवाचा सूड घ्या - रवींद्र मिर्लेकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा - लोकसभेची निवडणूक जिंकली म्हणून गाफील राहू नका. बुथप्रमुखांनी स्वत:ची टीम तयारी करावी. मागील विधानसभेतील पराभवाचा सूड घेऊन चोपड्यातील हुतात्मा कन्हैये बंधूंना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी केले. शिवसेनेच्या चोपडा तालुका बूथप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. हा मेळावा आनंदराज मार्केटमध्ये रविवारी सायंकाळी झाला.

व्यासपीठावर जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषद सदस्या इंदिरा पाटील, उपनगराध्यक्ष विकास पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे, सुधाकर बडगुजर, उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, सुकदेव निकम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील, अ&९६्न;ॅड.राजेश झाल्टे, कल्पना कोळी, सुनंदा पाटील, तालुकाप्रमुख देवेंद्र सोनवणे, शहरप्रमुख महेंद्र धनगर, प्रा.उत्तम सुरवाडे, बापू महाजन, श्याम गोंदेकर, कडू पाटील, सिंधूबाई राजपूत आदी उपस्थित होते. प्रा.सोनवणे, इंदिरा पाटील, चंद्रकांत पाटील, माजी आमदार पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

माजी आमदार पाटील यांनी अमळनेरचे आमदार साहेबराव पाटील यांच्या कामाबाबत स्तुतिसुमने उधळली. तसेच नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत रा ष्ट्र वादी मॅनेज झाल्याचे दिसते. रा ष्ट्र वादीला उमेदवारांचे वय माहीत नसावे, हा त्यांचा अज्ञानपणा असल्याची टीका त्यांनी केली. प्रास्ताविक देवेंद्र सोनवणे तर सूत्रसंचालन महेंद्र धनगर यांनी केले.