आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचा धुळे शहर विधानसभा मतदारसंघ लढवण्याचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेला धुळे शहर विधानसभा मतदारसंघ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला सोडण्यात यावा, असा ठराव कॉँग्रेस भवनात रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला. विशेष म्हणजे अद्याप निवडणुकीची घोषणा व कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली नसताना हा ठराव झाल्याने वातावरण तापले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे काही दिवसांपूर्वी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी भगतसिंग पाटील यांची समन्वयक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. शहराध्यक्ष युवराज करनकाळ अध्यक्षस्थानी होते. पीतांबर महाले, रमेश र्शीखंडे, साबीर शेख, मुकुंद कोळवले आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला भगतसिंग पाटील यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
या वेळी सेवादलाचे माधव मोरे यांनी धुळे शहर विधानसभा मतदारसंघ कॉँग्रेसला सोडण्यात यावा, अशी मागणी केली. त्यानंतर भिवसन अहिरे, खलिल अन्सारी, गोपाल अन्सारी, तव्वाब अन्सारी, राजेंद्र खैरनार, हरी चौधरी आदींनी ही मागणी लावून धरली. त्यानुसार बैठकीत शहर विधानसभा मतदारसंघ हा कॉँग्रेसला सोडण्याचा ठराव मंजूर झाला. माधव मोरे, साबीर शेख, मुकुंद कोळवले, प्रा. विलास पाटील, भिवसन अहिरे, खलिल अन्सारी, पारिजात चव्हाण, गोपाल अन्सारी, हरी चौधरी, कैलास गवळी, तव्वाब अन्सारी आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला. या वेळी नगरसेवक सदाशिव पाटील, सादिक शेख, अस्लम खान बागवान, किशोर गायकवाड, गोपाल चौधरी, माणिकराव शिंदे, मच्छिंद्र येरडावकर, सुनील पवार, प्रकाश शर्मा, वाणूबाई शिरसाठ, फारुक शेख, मोहसीन तांबोळी, अय्युब खाटीक, मनोहर अहिरे आदी उपस्थित होते.
उमेदवार राष्ट्रवादीचा
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अमरिश पटेल हे काँग्रेसच्या तिकिटावर उभे असले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते अशी स्थिती होती. संपूर्ण यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडून राबवण्यात आली. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. तसा प्रकार विधानसभा निवडणुकीत झाला तर लोकसभा निवडणुकीप्रमाणेच पक्षाची गत होईल, अशी शंका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
मनपाऐवढीच लोकसभेत मते
महापालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या उमेदवारांना 50 हजार 200 तर लोकसभा निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघात अमरीश पटेल यांना 49 हजार मते मिळाली. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या वॉर्डात नगरसेवक आहेत त्या वॉर्डातील मते लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मिळाली नाहीत. त्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही, असा आरोप करण्यात आला.