आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वकर्मा उत्सव: कस्तुरी मळवट, भांगी शेंदूर भरूनी हो...!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नवरात्रोत्सवातसध्या अनेक अपप्रकारांनी शिरकाव केला आहे, बलपूर्वक वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी खर्च यासह ध्वनीप्रदूषण महिलांची छेड यासारखे प्रकार रोखून आदर्श नवरात्रोत्सव सण साजरा करण्याचे आवाहन हिंदू जनजागृती मंचने केले आहे.
धार्मीक उत्सवातील अपप्रकार रोखून समाज, राष्ट्र धर्माची हानी रोखण्यासाठी समिती ११ वर्षांपासून कार्य करीत आहे. या उत्सवातही समितीने पुढाकार दर्शवला आहे. नवरात्रोत्सवातील गैरप्रकार त्याचे दुष्परिणाम या विषयीही समितीकडून प्रबोधन केले जात आहे. यासाठी मोहल्ला कमिटी नवरात्रोत्सव मंडळ बैठक यांच्या समितीची बैठक घेणे, पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव सण साजरा करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन द्यावे, गरबा-दांडियामुळे लहान मुले, वयस्कर मंडळी रुग्ण यांना त्रास होऊ नये, यासाठी ध्वनीमर्यादा पाळणे हे आयोजकांवर बंधनकारक करावे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलिसांची गस्त पथकांची नेमणूक करावी. मिरवणुकीत अनावश्यक आतषबाजी टाळावी, वाहतुकीला अडथळा ठरू नये, आदी प्रकारचे प्रबोधनही िहंदू जनजागृती समितीद्वारे केले जात आहे.