आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठलपेठेतील घराला अाग : सुमारे अडीच लाखांचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विठ्ठलपेठेतील कमलाकर खडखे यांच्या घराला अाग लागल्यानंतर झालेले साहित्याचे नुकसान. - Divya Marathi
विठ्ठलपेठेतील कमलाकर खडखे यांच्या घराला अाग लागल्यानंतर झालेले साहित्याचे नुकसान.
जळगाव - विठ्ठलपेठेतील शेतकरी कमलाकर निवृत्ती खडके यांच्या घराला रविवारी सकाळी ७.३० वाजता अचानक अाग लागली. यात सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले अाहे. अागीत गॅसची शेगडी जळाली असून सिलिंडरनेही पेट घेतला हाेता. परंतु, वेळीच अाग विझवण्यात अाल्याने माेठा अनर्थ टळला.

खडके हे रविवारी शेतात बैलजोडी आणण्यासाठी गेले होते. त्यामुळे घरात वरच्या मजल्यावर त्यांच्या पत्नी शारदा खडके ह्या एकट्याच होत्या. त्यांची दाेन्ही मुले तिसऱ्या मजल्यावर खेळत होती. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील वीजमीटरने अचानक पेट घेतला. त्यामुळे वायर जळत घराजवळ अाली. तेथे धान्याच्या कोठ्या, पोते खताच्या गाेण्या ठेवल्या हाेत्या. त्यांनीदेखील पेट घेतल्यामुळे अागीने रुद्र रूप धारण केले. हे पाहून शारदा खडके घरातून धावत बाहेर अाल्या; तर तिसऱ्या मजल्यावर खेळत असलेला खडके यांचा मुलगा मुलगी घराच्या मागील बाजूस असलेल्या शिडीने खाली उतरले. परिसरातील नागरिकांनी अागीबाबत मनपाच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यामुळे अवघ्या १० मिनिटांत बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन बंब दोन पाण्याच्या टँकरने सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास अाग आटोक्यात आली.

खडके यांनी शनिवारीच गॅसची नवीन शेगडी बसवलेली होती. तसेच शुक्रवारीच गॅस सिलिंडर भरून आणले होते. आगीत शेगडी जळाली असून सिलिंडरनेही पेट घेतला हाेता. मात्र, वेळीच आग विझवल्याने माेठा अनर्थ टळला. अागीत इलेक्ट्रॉनिक वस्तू, धान्य, कपडे शेतीची औजारे जळाली असून सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले अाहे. घटनास्थळाला भेट देऊन तलाठी खान यांनी पंचनामा केला.

शारदा खडके यांनी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, आगीच्या घटनेनंतर तेथे पोहोचलेल्या रेखा गॅस एजन्सीच्या कारागिराने गॅसगळती झाल्यामुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला आहे.

रेग्यूलेटरवर उच्च दाब आला
खडकेयांच्या घरात गॅस ओटा नाही. या कारणाने रेग्युलेटरवर उच्च दाब आला. पर्यायाने गॅसगळती झाली अन‌् वेगाने गॅसपुरवठा झाला. त्यामुळे ही आग लागली असावी. - भरतपवार, रेखा गॅस एजन्सी
बातम्या आणखी आहेत...