जळगाव - निवडणूक आयोगाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार लोकसभेची मतमोजणी केली जाणार आहे. नव्या धोरणानुसार मतमोजणीला उशीर होणार असला तरी यंत्रणेकडून मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत निकाल घोषित होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात बुधवारी दोन्ही निवडणूक निर्णय अधिकार्यांनी बैठक घेऊन यंत्रणेकडून आढावा घेतला.
मतमोजणी करताना एका फेरीसाठी एक तासाचा अवधी लागण्याची शक्यता आहे. सकाळी 8 वाजता टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल. 8.30 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. यासंदर्भात केलेल्या तयारीच्या आराखड्याचा आढावा यंत्रणेकडून सादर करण्यात आला आहे.बुधवारी झालेल्या बैठकीला सर्व तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी उपस्थित होते. चोख नियोजनातून वेळेत निकाल जाहीर करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. मतमोजणीसाठी एमआयडीसीत एफसीआय गोडावूनमध्ये होणार आहे.