आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डमी मतदार उभे करणाऱ्यांवर व्हावी कारवाई, मतदार यादीत परप्रांतीयांची नावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकतींचा अक्षरशा पाऊस पडला आहे. बहुतांश प्रभागातील मतदार याद्यांवरील हरकती पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. विशेषत: प्रभाग क्रमांक १५च्या यादीत परप्रांतीयांची डझनभर नावे असल्याच्या गंभीर तक्रारी हरकतींमधून झाल्याने खळबळ उडाली आहे. प्राप्त हरकतींनुसार स्पॉट व्हिजिट करून १५ ऑक्टोबरपर्यंत अंतिम यादी तयार होईल, असे सूत्रांनी सांगितले.
नगरपालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. तहसील प्रशासनाकडे या संदर्भात नवीन मतदार नोंदणी करण्यात आली होती. यात ३१ सप्टेंबरपर्यंत मुदत असतानाही प्रशासनाने शेवटच्या दिवशी अालेल्या कागदपत्रांना केराची टोपली दाखवली. प्रारुप यादीमध्येच अनेक स्थलांतरित, नवीन मतदारांची नावे समाविष्ट झाली नाहीत, तर काही प्रभागांमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. याप्रकरणी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी झालेल्या आहेत. एवढेच नव्हे, शहरातील सर्व प्रभागांमधील मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ आहे. मतदारांचा पत्ता पाहता प्रसिद्ध केलेल्या नकाशानुसार त्या-त्या भागातील प्रभागात मतदारांचे नाव असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक मतदारांची नावे अन्य प्रभागांच्या यादीत टाकली आहेत. काही ठिकाणी तर पती, पत्नीचे नाव विभिन्न प्रभागांमध्ये आहे. शुक्रवारी अखेरच्या दिवशी भाजपचे माजी सरचिटणीस खुशाल जोशी यांनी प्रभाग क्रमांक १५मध्ये परप्रांतीयांची नावे असल्याची तक्रार करत खळबळ उडवून दिली.

Áअशी बनवा बनवी: प्रभाग१५मध्ये अनेक मतदारांचे पत्ते दिले नसून केवळ झोपडी असा उल्लेख करून नावे समाविष्ट केली आहेत. घरांचे क्रमांक दिलेले नाहीत. पत्ता घरनंबर टाकता केवळ झोपडी असा उल्लेख अाहे. प्रभाग १०, २२ आणि २४ मध्ये लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या जास्त आहे. यामुळे अनेक नावांना कात्री लागेल. बळाचा वापर करून डमी मतदार उभे करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.

Áपुढील प्रक्रिया अशी : पालिकेकडेपुराव्यासह प्राप्त हरकतींवर आता पडताळणी सुरू होईल. पालिकेच्या वसुली विभागातील कर्मचाऱ्यांकडून हरकतींनुसार पडताळणी करून अंतिम अहवाल दिला जाईल. तत्पूर्वी, हरकत घेण्यासाठी पत्त्याचा पुरावा देणे बंधनकारक असल्याचे सांगून मतदारांची कोंडी सुरू आहे, असे निवेदन प्रा. धीरज पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

याचिका टाकणार
प्रभागसातमधील अनेक मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये आहेत. स्थलांतरित आणि नवीन मतदारांची नावे समाविष्ट झाली नाहीत. याबाबत तक्रारी केल्या असून अंतिम यादीत नावे नसल्यास थेट खंडपीठात याचिका दाखल करणार. मुकेशपाटील, अध्यक्ष, मस्त रहो ग्रुप

कारभार चव्हाट्यावर: शहरातील सर्वच प्रभागातील मतदार याद्यांबाबत तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनागोंदी समोर आली.
बातम्या आणखी आहेत...