आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voting Ink News In Marathi, Mhaisoor, Divya Marathi, Jalgaon

म्हैसूरच्या शाईला 52 वर्षांचा इतिहास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या बोटावर काळ्या रंगाची शाई लावली जाते. प्रत्येकाच्या वाटते की ही शाई नेमकी कोठून येते?.. तिच्यात काय असते?.. असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तर ही शाई कर्नाटकातील म्हैसूर येथे तयार होऊन संपूर्ण देशात या शाईचा पुरवठा केला जातो. 10 मिलीच्या बाटलीची किंमत 183 रुपये असून 700 ते 800 मतदारांना एक बाटली लागते. सन 1962पासून म्हैसूर येथूनच शाईचा पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील 3 हजार 348 केंद्रांवर 740 लिटर शाई लागणार आहे.


बोगस मतदानामुळे झाला वापर
सर्वप्रथम 1962मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शाईचा वापर करण्यात आला. त्यानंतर देशात होणार्‍या प्रत्येक निवडणुकीसाठी शाईचा वापर होऊ लागला. हे एक क्रांतिकारी पाऊल होते. त्यावेळी देशातील काही भागात बोगस मतदान होण्याच्या घटना घडत होत्या. या घटना थांबवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करण्यात आला.


15 सेकंदात वाळते शाई
या शाईच्या 10 मिली लिटर बाटलीची किंमत 183 रुपये एवढी आहे. 2009मध्ये झालेल्या निवडणुकीत 19 लाख शाईच्या बाटल्या देशभरात लागल्या होत्या. 2004मध्ये 16लाख 7 हजार बाटल्यांचा वापर करण्यात आला होता. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत मार्कर पेनचा उपयोग केला होता. या वेळी प्रत्येक केंद्रावर दोन प्रमाणे 10 मिली लिटरच्या 7400 बाटल्या येणार आहेत. 10 मिलीच्या एका बाटली 700 ते 800 मतदारांना लागेल एवढी शाई असते. या शाईचे पेटंट भारत सरकारने गुप्त ठेवले आहे. या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट आणि अल्कहोल याचे मिश्रण असल्याचे काही जाणकार सांगतात. ही शाई बोटावर लावल्यानंतर 15 सेकंदात तिचा ओलसरपणा नष्ट होतो. त्यानंतर कितीही प्रय} केले तरी 20 दिवसांपर्यंत पूर्णत: शाई पुसली जात नाही.


25 देशांनाही होतो शाईचा पुरवठा
म्हैसूर येथील म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड कंपनीमध्ये ही शाई तयार केली जाते. ही कंपनी कर्नाटक राज्य सरकारच्या अंतर्गत येते. देशात ही एकमेव कंपनी असून या कंपनीला शाई निर्माण करण्याचा आणि विकण्याचा अधिकार आहे. ही कंपनी केवळ भारतालाच नव्हे तर थायलंड, सिंगापूर, नायजेरिया, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान सारख्या आणखीन जगातील 25 देशांना शाईचा पुरवठा करण्याचे कंत्राट याच कंपनीला देत असते. म्हणून निवडणुकीत वापरल्या जाणार्‍या शाईला ‘म्हैसूर शाई’ म्हणून ओळखले जाते.


2004 मध्ये शाईच्या 16लाख 7 हजार बाटल्यांचा झाला होता वापर
2009 मध्ये शाईच्या 19लाख बाटल्यांचा झाला होता देशभर वापर