आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघूर प्रकरण: होय, आम्ही देखील ‘सह्या’जीरावच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वाघूर पाणीपुरवठा योजनेतील चौकशीच्या दुसर्‍या दिवशीही तीन नगरसेवकांनी ‘सह्या’जीरावचा कित्ता गिरवत 7 शिवाजीनगर’कडेच बोट दाखवले. यात माजी नगरसेवक डी.डी.वाणी, विजय वाणी व लक्ष्मीकांत चौधरी यांचा समावेश होता.

नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी 28 जुलै 2012 ला वाघूर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात शहर पोलिस ठाण्यात अपहाराची फिर्याद दाखल आहे. याप्रकरणी कागदपत्रे जप्त केल्यानंतर तपास कामाला सुरुवात झाली आहे. नऊ नगरसेवकांना टप्प्याटप्प्याने जबाबासाठी बोलवले जात आहे. गुरुवारी तिघा नगरसेवकांनी आपण केवळ सह्या केल्याचे सांगितले होते. हाच कित्ता कायम ठेवत शुक्रवारी जबाबासाठी आलेल्या माजी नगरसेवक डी.डी.वाणी, विजय वाणी व लक्ष्मीकांत चौधरी यांनीही तीच भूमिका कायम ठेवली. केवळ बैठकीचे निमंत्रण मिळाल्यानंतर बैठकीला उपस्थिती देणे एवढेच काम आम्ही केले. शहराच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न असल्याने खोलवर चौकशी केली नाही. फक्त विषयांना अनुमोदन दिल्यानंतर पाच मिनिटात विषय मंजूर होत असत. सर्व निर्णय ‘7 शिवाजीनगर’ येथेच घेतले जात, असे माजी नगरसेवक डी.डी.वाणी यांनी सांगितले.

तपासाधिकार्‍यांनी संबंधित नगरसेवकांना वाघूर प्रक्रियेविषयीची माहिती विचारली. याबाबतचा अहवाल तयार झाल्यावर सहीसाठी पुन्हा बोलवू, अशी सूचना मिळाल्याचे माजी नगरसेवकांनी सांगितले. शनिवारी शांताराम सपकाळे, वासुदेव सोनवणे, अजय जाधव या नगरसेवकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.