आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघूर, विमानतळ, जिल्हा बँक घोटाळ्याच्या चौकशीला गती, ठोस कारवाई होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घरकुल घोटाळ्याच्या चौकशीनंतर आता उर्वरित वाघूर, विमानतळ, जिल्हा बँकेतील आयबीपी अकाउंट, अॅटलांटा या गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू झाला आहे. या गुन्ह्यांचे तपासाधिकारी तथा पोलिस उप अधीक्षक किशोर पाडवी यांनी याला दुजोरा दिला. यात संशयीत आरोपींच्या अटकेची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा आजी माजी नगरसेवकांना घाम फुटणार आहे.

जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणारा घरकुल घोटाळ्यानंतर या मोठ्या घोटाळ्यांच्या फायली धूळखात पडून होत्या. पोलिस उप अधीक्षक पाडवी यांनी या घोटाळ्याच्या तपासाला सुरुवात केली आहे. त्यांनी गेल्या तीन दिवसांत जिल्हा बँकेतील काही अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलावून चौकशी संदर्भातील माहिती मिळवली आहे. तसेच मनपाकडूनही काही कागदपत्रे मिळवण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.

ठोस कारवाई करणार

आर्थिक प्रकारचे गुन्हे असल्याने त्याची चौकशी सुरू आहे. तपासाची गती वाढवण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात काही अधिकाऱ्यांना बोलावून चौकशी केली आहे. येत्या काही दिवसांत ठोस कारवाई केली जाणार आहे. किशोर पाडवी, पोलिस उप अधीक्षक तथा तपासाधिकारी