आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमदार पावसाची प्रतीक्षा कायमच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पडरं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं तहानलेलं चातकावाणी, अशी आर्त हाक शेतकरी वरूण राजाला घालत आहे. चार दिवसापूर्वी पावसाने हलकीशी हजेरी लावली. परंतु अद्याप पाहिजे तसा दमदार पाऊस झालेला नाही.

ढग दाटून येतात, पावसाचे वातावरण निर्माण होते. मात्र, पाऊस पडल्याने नागरिकांची निराशा होते. जून महिना संपत आला तरी अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. गेले दोन दिवस पावसाने हलकीशी हजेरी लावली. मात्र, नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. गुरुवारी दुपारी ढग दाटून आले होते. सर्वांच्या नजरा अपेक्षेने आकाशाकडे रोखल्या गेल्या. आता पाऊस पडेलच, असे वातावरण निर्माण झाले. मात्र, काही वेळांतच ढगांचा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. पुन्हा कडक ऊन पडल्याने नागरिक नाराज झाले. गुरूवारी शहराचे तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत हाेतेे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले. रात्री पुन्हा आकाशात ढगांनी गर्दी केली, पुन्हा सर्वांच्या अाशा पल्लवित झाल्या होत्या; पण पाऊस पडला नाही.

घन निळे दाटूनी आले...
शहरात गेल्या दोन दिवसांपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. दिवसभरात अधून-मधून आकाशात ढगांची गर्दी होते. त्यामुळे आता दमदार बरसेल, अशी आशा केली जाते. परंतु काही तासांतच ती आशा फोल ठरते.
गुरुवारी देखील दुपारी वाजेच्या सुमारास आकाशात ढगांनी गर्दी केल्याचे इच्छादेवी चौकात टिपलेले छायाचित्र. छाया: संजय जुमनाके
बातम्या आणखी आहेत...