आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

43 मद्यविक्री दुकाने सुरू करण्यासाठी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालिका हद्दीतील मद्यविक्रीच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शहरातील ४३ मद्यविक्रीचे दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 
राष्ट्रीय राज्य मार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेली सर्व दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टने दिले होते. या आदेशानुसार जळगाव शहर तालुक्यातील ४५ दारूची दुकाने प्रभावित झाली होती. मात्र या निर्णयापासून पळवाट काढण्यासाठी सहा रस्ते अवर्गीकृत करण्याचा निर्णय घेतल्याने या दुकानांना अभय मिळाले होते. ते सहा रस्ते पालिकेकडून पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे त्या सहा रस्त्यावरील दारूची दुकाने बंद करण्याची कारवाई झाली. या दुकानांच्या परवान्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नूतनीकरण केलेे नव्हते. मात्र या दुकानांना स्थलांतराचा मार्ग मोकळा होता. त्यानुसार शहरातील ४५ पैकी मद्यविक्रीच्या दुकाने स्थलांतरीत झाली आहेत. आता उर्वरित ४३ दुकानांचेही न्यायालयाच्या निर्णयानुसार नूतनीकरण होऊ शकणार आहे. 
 
जिल्ह्यात ५६० मद्यविक्रीच्या दुकानांना लाभ 
जिल्ह्यात७४९ मद्य विक्रीची दुकाने आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार सद्यस्थितीत १८९ मद्य दुकाने सुरू आहेत. ५६० मद्यविक्रीची दुकाने बंद होती. त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे केले नव्हते. आता न्यायालयाने महानगरपालिका, नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रातील ज्यांचे २०१७-१८ दरम्यान रद्द झालेल्या मद्यविक्रीच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार अाता ५६० मद्य विक्रीच्या दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येईल. 
 
आदेश प्राप्त झाले नाहीत 
न्यायालयाने महानगरपालिका, नगरपालिका नगरपंचायत हद्दीतील मद्यविक्रीच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या संदर्भात राज्य शासनाचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. आदेश प्राप्त झाल्यानंतर परवाना नूतनीकरणाबाबत कार्यवाही करण्यात येईल. 
- सु. ल. आढाव, अधीक्षकराज्य उत्पादन शुल्क विभाग 
बातम्या आणखी आहेत...