आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रभाग आरक्षण सोडत जाहीर, अनूसूचित जाती राखीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - डिसेंबरमध्ये होणाऱ्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी पलिका सभागृहात प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. यात सुरुवातीचे पहिले चारही प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्यामुळे विद्यमान नगरसेवकांची कोंडी झाली. तर सर्वाधिक इच्छुक असलेल्या प्रभाग सातमध्ये ‘एस.सी.’ प्रवर्गाचे आरक्षण निघाल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले.
पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर केली. नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्यासह विद्यमान नगरसेवक, इच्छुक उमेदवार उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात अनुसचित जाती राखीव आणि अनुसूचित जमाती राखीव वॉर्ड लोकसंख्येच्या आधारे निश्चित करण्यात आले. प्रभाग एकमध्ये अनुसूचित जाती राखीव जागा असल्याने एकाच प्रभागात दोन आरक्षण देता येणार नव्हते. यामुळे अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी या खालोखाल लोकसंख्या असलेल्या प्रभाग क्रमांक २४मध्ये अनुसूचित जमातीचे राखीव आरक्षण जाहीर करण्यात आले. शहरातील प्रभाग क्रमांक एक ते चारमध्ये भाजपच्या दिग्गज सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गातील जागा आरक्षित झाल्या आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव
प्रभागप्रभाग आरक्षण प्रभाग आरक्षण
सर्वसाधारणसर्वसाधारण महिला
१० महिला सर्वसाधारण
११ सर्वसाधारण सर्वसाधारण महिला
१३ महिला सर्वसाधारण
१४ सर्वसाधारण सर्वसाधारण महिला
१५ सर्वसाधारण सर्वसाधारण महिला
१६ महिला सर्वसाधारण
१७ महिला सर्वसाधारण
१९ महिला सर्वसाधारण
२० महिला सर्वसाधारण
२१ सर्वसाधारण सर्वसाधारण महिला
२२ महिला सर्वसाधारण
२३ सर्वसाधारण सर्वसाधारण महिला

नगराध्यक्ष पदाकडे नजर : शहरातीलप्रभागांची प्रारुप रचना, भागांचे नकाशे, आरक्षण आदी प्रक्रिया झाली आहे. यामुळे संभाव्य लढतींचे चित्र स्पष्ट झाले अाहे. आता नेत्यांचे लक्ष नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे आहे. साधारण ऑगस्ट महिन्यात हे आरक्षण निघेल, असा अंदाज आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण एससीचे निघेल, असे संकेत मिळत आहेत.

काहींना अचानक लॉटरी
प्रभाग रचनेत बहुतांश सर्वच विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित आहेत. काहींना अचानक लॉटरी लागली आहे. रेखा सुनील सोनवणे या प्रभाग १२ मधून निवडून आल्या होत्या. त्यांना आता प्रभाग २४ मधून पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांना प्रभाग आठ पाचमधून संधी आहे. दोन्ही भागांमध्ये त्यांचे हक्काचे मतदान विभागले गेले आहे. तर नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांना प्रभाग क्रमांक १४ मधून संधी आहे. अपक्ष नगरसेवक निर्मल कोठारी यांना निवडणूक लढण्यासाठी प्रभाग १९ मधून अनुकूल स्थिती आहे.

प्रभाग प्रभाग प्रभाग
महिलासर्वसाधारण
महिला सर्वसाधारण
सर्वसाधारण सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण सर्वसाधारण महिला
महिला सर्वसाधारण
१२ महिला सर्वसाधारण
१८ सर्वसाधारण सर्वसाधारण महिला
अनुसूचितजमाती राखीव
महिलासर्वसाधारण
२४ सर्वसाधारण सर्वसाधारण महिला
सर्वसाधारणराखीव
सर्व.महिला सर्वसाधारण
सर्व. महिला सर्वसाधारण
बातम्या आणखी आहेत...