आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षेत्रसभा न घेणाऱ्यांना अपात्र ठरवा; अॅड.दाणेज यांची आयुक्तांना नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील ७२ नगरसेवकांनी आपल्या वॉर्डात क्षेत्रसभा घेतलेल्या नाहीत. या नगरसेवकांना दोन महिन्यांच्या आत अपात्र ठरवा, अशी नोटीस जस्टिज फॉर कपंनी‌ज‌् लीडर्स अॅण्ड मेंबर असोसिएशनच्या वतीने अॅड.विजय दाणेज यांनी महापालिका आयुक्तांना दिली आहे.
७२ नगरसेवकांनी क्षेत्रसभा घेतली नसल्याबाबतची पाेलखाेल करणारे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले हाेते. त्यानंतर काही नगरसेवकांनी तातडीने क्षेत्रसभा घेऊन तसे अहवाल पालिकेला सादर केले आहेत. मात्र, आता ज्यांनी यापूर्वी क्षेत्रसभा घेतल्याच नाही त्यांना अपात्र ठरवा, अशी मागणी अॅड.दाणेज यांनी केली आहे.
मुंबई प्रांतिक महापािलका कायद्याच्या कलम ४८७प्रमाणे अॅड.दाणेज यांनी ही नोटीस दिली आहे. दोन महिन्यांच्या आत महापालिका आयुक्तांनी कारवाई केल्यास याच नोटीसचा आधार घेत अॅड.दाणेज हे न्यायालयात याचिका दाखल करतील. तसेच क्षेत्रसभा घेतल्यामुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामाेरे जावे लागते, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.