आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तापी नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ/रावेर- पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणाची जलपातळी वाढली आहे. शुक्रवारी धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे साडेसहा मीटरने उघडण्यात आले. भुसावळ शहरातही 12 मि.मी. पावसाची नोंद झाली.

तापी आणि पूर्णा नदीच्या उगमस्थानावर गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणार्‍या चिखलदरा येथे 164.6 तर टेक्सा येथे 191.00 मि.मी. एवढय़ा विक्रमी पावसाची नोंद झाली. या मुळे धरणातील पाणीसाठा शुक्रवारी सकाळपासून वाढण्यास सुरूवात झाली. या मुळे पाटबंधारे विभागाने सकाळी धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे उघडले. सायंकाळी 5 वाजता धरणात 211.380 मीटर जलपातळी, तर 252.00 दलघमी जलसाठा होता. धरणातून 7 हजार 576 अर्थात 2 लाख 67 हजार 584 क्युसेस प्रतिसेकंद वेगाने विसर्ग करण्यात आला. हतनूर धरणातून झालेल्या विसर्गामुळे तापी नदी दुथडी भरुन वाहत आहे. या मुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच शहरात पावसाने हजेरी लावली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 12.00 मि.मी. पावसाची नोंद केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात झाली.

रावेरमध्ये पाच गावांचा संपर्क तुटला
हतनूर धरणातील आवक वाढल्याने बॅकवॉटरचा फुगवटा वाढला. परिणामी रावेर तालुक्यातील काठावरील ऐनपूर-निंबोल, विटवा-निंबोल, खिरवड-नेहता या गावांचा संपर्क तुटला आहे. ऐनपूर-निंबोल रस्त्यावर पाणी साचल्याने या गावांचा संपर्क तुटला. तसेच विटवा-निंबोल रस्ताही पाण्याखाली गेल्याने दळणवळण ठप्प झाले. खिरवड-नेहता रस्त्यावरही पाणी होते. खिरवड येथील 15 कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. निंभोरासीम येथे महसूल तलाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. तालुक्यात आतापर्यंत 474.60 मि.मी.पावसाची नोंद झाली. तलाठय़ांना मुख्यालयी थांबवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.