आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास खुनाचा गुन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी पांडेय यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शाळेत मध्यान्ह भाेजनामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार असणाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा िजल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अास्तिककुमार पांडेय यांनी दिला.
‘प्रशासन अापल्या दारी’ अभियानांतर्गत गुरुवारी जळगाव तालुक्याची अाढावा बैठक झाली. त्यात ते बाेलत हाेते. या वेळी पांडेय यांनी अधिकाऱ्यांचेही चांगलेच कान उपटले. बैठकीला पंचायत समिती सभापती हिराबाई माेरे, िजल्हा परिषद सदस्या लीलाबाई साेनवणे, लीना महाजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, नंदकुमार वाणी, राजीव साेळुंके, डाॅ.शिवाजी पवार, मधुकर चाैधरी, प्रभाकर साेनवणे अादी उपस्थित हाेते.

या बैठकीत नशिराबाद येथील िजल्हा परिषद शाळेत शालेय पाेषण अाहाराच्या धान्यात उंदीर अाढळून अाल्याची तक्रार केली. त्यावर पांडेय यांनी संबंिधत अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. ग्रामसेवक कामावर येणे तर दूरच, फाेनसुद्धा उचलत नसल्याची तक्रार सभापतींनी केली.

स्वच्छता विभागाच्या कामावर नाराजी-
जळगाव तालुक्यात १,६९८ शाैचालये बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात अाले हाेते. मात्र, त्यापैकी केवळ ५५० शाैचालयेच पूर्ण झाल्याने या विभागाच्या कामावर सीईअाेंनी नाराजी व्यक्त केली. तुम्हाला सक्ती केली जात नाही, कारवाई केली जात नाही ताेपर्यंत तुम्ही कामच करत नाही, याची खंत वाटत असल्याचे सांगून उर्वरित शाैचालयांचे बांधकाम लवकर पूर्ण झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी िदला.

इंग्रजीची पुस्तके नाहीत
शैक्षणिकवर्ष संपण्यासाठी काही िदवसच उरले अाहेत. मात्र, तरीही िशरसाेलीच्या शाळेला तिसरी अाणि पाचवीची इंग्रजीची पुस्तके उपलब्ध झाल्याने प्राथमिकचे शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना िवचारणा केली. त्यावर मागणीच झाली नसल्याचे त्यांनी सांिगतले. केंद्रप्रमुखांनी याबाबत कळवले हाेते. मात्र, पुरवठा अपूर्ण झाल्याचे सांिगतले. त्यावर संंबंिधतांना ‘कारणे दाखवा’ नाेटीस बजावण्याचे अादेश पांडेय यांनी िदले.
ग्रामपंचायत इमारती रखडल्या
प्रत्येक ग्रामपंचायतीकडे स्वतची इमारत असावी म्हणून शासनाने िनधी उपलब्ध करून िदला. मात्र, जळगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना जागा उपलब्ध झाल्याने िनधी परत जाण्याची वेळ अाली अाहे. ज्या िठकाणी जागा नाहीत तेथे निधी का उपलब्ध करून देता? असा प्रश्न पांडेय यांनी िवचारला.
पुढील वर्षी एक लाखाचे टार्गेट
२०१५-१६या वर्षात एक लाख शाैचालये बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचेही पांडेय यांनी सांिगतले. िजल्ह्यातील ६.५ लाख कुटंुबांकडे अजूनही शाैचालये नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये अाराेग्याबाबत जनजागृती करून गुड माॅर्निंग पथक अधिक कार्यान्वित करण्याच्या सूचना िदल्या. यासंदर्भात िशक्षक, ग्रामसेवक अंगणवाडीसेविकांनाही उद्दिष्ट देण्यास सांिगतले. तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर लेखापरीक्षणासाठी िदल्यास संबंिधत ग्रामसेवकाला २५ हजार रुपये दंड ठाेठावून कारवाई करण्याचा इशारा िदला.

पांडेययांनी फक्त कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर ग्रामपंचायत िवभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनाही खडे बाेल सुनावले. काही ग्रामपंचायतींनी गतवर्षीच्या जून महिन्यापासून अकाउंट क्लाेजिंग केलेले नसल्याचे या वेळी समाेर अाले. त्यावरून पाटील यांनाही पांडेय यांनी खडसावले. जून महिन्यापासून तुम्ही काय अाढावा घेतला? असा प्रश्न िवचारल्यावर पाटील निरुत्तर झाले. त्यानंतर पांडेय यांनी त्यांना दाेन िदवसांत सर्व काम पूर्ण करण्याचे अादेश िदले.