आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वॉश आऊट’ मोहीम तीव्र, नगरसेवक निर्मल ऊर्फ पिंटू कोठारीविरुद्ध हद्दपारी प्रस्तावित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातपोलिसांनी सुरू केलेली ‘वॉश आऊट’ मोहीम गुरुवारी (दि.२४) सलग तिसऱ्या दविशी अधिक तीव्र करण्यात आली. त्यामुळे अवैध व्यावसायकिांना पळता भुई थोडी झाली आहे. वाॅश आऊट मोहिमेत गुरुवारी ठकिठकिाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच वाहनधारकांच्या कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली. तपासणी त्रुट्या आढळणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला.

गुरुवारी विनाक्रमांकाच्या वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी, तसेच कारवाईदरम्यान पुढाऱ्यांशी बोलण्याची गळ घालणाऱ्यांना चोप देऊन कारवाई करावी, अशा सक्त सूचना बाजारपेठचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

कारवाईबाबतगुप्तता :अवैध व्यवसांयावर छापे टाकण्यासाठी निरीक्षक नजनपाटील यांनी कुशल नियोजन केले. कारवाईसाठी डीबी पथकातील कर्मचाऱ्यांची चार पथकांमध्ये विभागणी करण्यात आली. तसेच ज्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार त्यांची नावे चार चिठ्ठ्यांमध्ये लिहिण्यात आली. चारही पथकांना या चार चिठ्ठ्या उचलण्याच्या सूचना निरीक्षक नजनपाटील यांनी दिल्या. अशाप्रकारे प्रत्येक पथकाच्या वाट्याला आलेल्या अवैध व्यावसायकिांवर कारवाई झाली. कारवाईदरम्यान पथकातील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाइल काढून घेण्यात आले होते. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.

खूनप्रकरणी तिघांचा शोध :शहरातील वैतागवाडी भागात झालेल्या जवानाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. याप्रकरणात आणखी तीन जणांचा शोध सुरू आहे. त्यांची नावे पोलिसांना कळाली आहेत. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
थोपटले दंड

शहरातीलगुंडगिरी करणारे दादा, अवैध व्यवसाय चालवणारे व्यावसायकि यांच्याविरुद्धही पोलिसांनी दंड थोपटले आहे. बुधवारी शहरातील सट्टा पेढ्यांवर पोलिसांनी छापे टाकले होते. तसेच सट्टापेढीच्या मालकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे अवैध व्यावसायकिांचे धाबे दणाणले आहे. नगरसेवक निर्मल ऊर्फ पिंटू कोठारी याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस नगरसेवक कोठारीचा शोध घेत आहेत.

मद्यपी वाहनचालकांचीतपासणी :शहरात सध्याकाळी नशेत वाहने चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या केसेस मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहेत. शहर वाहतूक शाखेसोबतच शहर पोलिस ठाणे आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याचे अधकिारी आणि कर्मचारी कारवाई करत आहेत. बुधवारी आणि गुरुवारी १७ वाहनधारकांवर कारवाई झाली.

शहरात सुरू असलेल्या कारवाईच्या मोहिमेत कुणीही हस्तक्षेप करू नये, असे आवाहन केले आहे. कुठल्याही गुन्ह्यासंदर्भात वारंवार पोलिसांना फोन करणाऱ्यांविरुद्धही, कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. किसनसरावनजन पाटील, पोलिस निरीक्षक

हद्दपारीचा प्रस्ताव : गणेशोत्सवामुळेहद्दपारीचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. त्यात नगरसेवक निर्मल कोठारी याचाही समावेश आहे. बाजारपेठ ठाण्यात कोठारीविरुद्ध भाग सहाचे १७ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला जात आहे, अशी माहिती निरीक्षक नजन पाटील यांनी दिली आहे.