आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतनूरमध्ये 33 वर्षांच्या तुलनेत यंदा विक्रमी जलसंजीवनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या पावसाळ्यात दरमहा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. यासह फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गेल्या 33 वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच मे अखेरीस हतनूरमध्ये 52.35 टक्के जलसाठा आहे. हतनूरच्या जलसंजीवनीची ही ऐतिहासिक नोंद असून सिंचन, औद्योगिक प्रकल्प आणि पिण्यासाठी हा जलसाठा तब्बल चार महिने पुरेल एवढा आहे.

हतनूर धरणाची निर्मिती सन 1981 मध्ये केली. यानंतर 1986 मध्ये आलेल्या महापुरात धरण तब्बल 22 टक्के गाळाने भरले. सन 2010 मध्ये हे प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचा अहवाल ‘मेरी’ने दिला आहे. गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातून तब्बल चार महिने विसर्ग सुरू होता. आता मे अखेरीसही धरणामध्ये निम्मेपेक्षा जास्त जलसाठा आहे. हतनूर धरणातून अमळनेर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजव्या तट कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले होते.