आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतनूरमधून एक हजार क्युसेसचे आवर्तन सोडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेच्या पाणीपुरवठा बंधा-यातील जलपातळी तब्बल 91 इंचाने घसरल्याने शहरावर पाणीटंचाईचे सावट होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शहरासाठी 1 हजार क्युसेस पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी हे पाणी बंधा-यात पोहोचणार असले तरी रविवारपर्यंत (दि.6) 50 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.

हतनूर धरणातून शहराला आवर्तन मिळण्यासाठी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता ए. बी. चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई शाखेत स्वत: जाऊन मागणी नोंदवली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार धरणांतील राखीव साठ्याची जबाबदारी जिल्हाधिका-यांकडे देण्यात आली आहे. नगराध्यक्ष नेमाडे यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून आवर्तनाच्या आदेशावर सायंकाळी 7 वाजेदरम्यान स्वाक्षरी मिळवली. हतनूरमधून विसर्ग झाला तरी हे पाणी शुक्रवारी सायंकाळी बंधा-यात पोहोचेल. यानंतरही शहरवासीयांना दोन दिवस पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील. कारण रविवारपर्यंत 50 टक्क््यांपर्यंत जलकपात होणार आहे.

ताशी 7 लाख लिटर्सची उचल
बंधा-यातील जलपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. ताशी 11 लाख लिटर पाणी बंधा-यातून उचलणे आवश्यक असते. जलपातळी घसरल्याने सध्या केवळ 6 लाख लिटर पाण्याची उचल होते. बंधा-याची पातळी पुन्हा खालावल्यास पंपिंग यंत्रणा बंद होऊन शहरातील पाणीपुरवठा ठप्प होऊ शकतो. यासाठी आवर्तन आवश्यक होते.

उपलब्ध पाणी जपून वापरा
- जिल्हाधिका-यांकडे पाठपुराव्यानंतर केवळ एक हजार क्युसेस पाणी मिळाले. रविवारनंतर जलकपात करून यानंतर पुरवठा पूर्ववत होईल. पाण्याचा जपून वापर करावा.
ए.बी.चौधरी, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग
फोटो - डमी पिक