आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनातर्फे तीन तासांत जलवाहिनीची दुरुस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील जुना खेडीरोड परिसरातील चार इंच व्यासाची जलवाहिनी सोमवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास फुटली होती. त्यामुळे सुमारे तासभर पाण्याची गळती सुरू होती. प्रशासनाच्या लक्षात ही बाब येताच पुरवठा थांबवून या गळती दुरुस्तीचे काम अवघ्या तीन तासांत पूर्ण करण्यात आले.
पाणीपुरवठा विभागातर्फे शहरातील विविध भागातील गळत्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत 50पेक्षा अधिक ठिकाणच्या लहान-मोठय़ा गळत्या दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. तसेच दैनंदिन समोर येणार्‍या गळत्याही तातडीने दुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. सोमवारी जुना खेडीरोड परिसरात चार इंच व्यासाची जलवाहिनी फुटली होती. तिच्या दुरुस्तीचे काम अवघ्या तीन तासांत पूर्ण करण्यात आले.
त्यानंतर कालिका माता मंदिर चौकातील 12 इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले होते. जलवाहिनीच्या जवळून उच्च क्षमतेची वीजवाहिनी जमिनी खालून गेली असल्याने वीजपुरवठा बंद केल्यावरच काम करणे शक्य झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे काम देखील पूर्ण करण्यात आले. कनिष्ठ अभियंता अविनाश कोल्हे, संजय काळे, जगन सोनवणे, गोपाळ कोळी, एकनाथ सपकाळे यांच्या पथकाने दुरुस्ती केली.