आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Harvesting Complusary On New Buillding In City

शहरात नव्या इमारतींना ‘वॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका हद्दीतील भूजलपातळी वाढवण्याच्या दृष्टीने पालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार नवीन इमारतींवर ‘वॉटर हार्वेस्टिंग’ यंत्रणा बसवणे सक्तीचे करणे गरजेचे असल्याच्या विषयाकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले होते. महापौरांकडून याची दखल घेत महासभेच्या मंजुरीसाठी हा विषय आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.


शहरातील भूजलपातळी वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासंबंधी महापौर किशोर पाटील यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीस पालिकेचे प्रमुख अधिकारी, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी व महाराष्ट्र पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील केवळ दीड टक्के इमारतींवरच वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवली असल्याच्या विषयाकडे 29 मार्च रोजी ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले होते. ही यंत्रणा सक्तीची करण्यासह नाले रुंदीकरण, खोलीकरण, नाल्यांवर बंधारे आदी विषयांकडेही लक्ष वेधले होते. याची दखल घेऊन महापौरांनी हे विषय हाताळणे सुरू केले आहे. शहरातून वाहून जाणारे सांडपाणी अडवून त्याचे पुनर्भरण केल्यास भूजलपातळीत वाढ होणे शक्य असल्याचे त्यांनी या वेळी अधिकार्‍यांना सांगितले. संपूर्ण शहर पर्यावरणपूरक करण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी शहरातील शाळा- महाविद्यालये, दवाखाने, व्यापारी संकुले आदी ठिकाणी जल पुनर्भरण यंत्रणा बसवण्यात येणार आहे. तसेच पर्यावरणास हानिकारक ठरत असलेल्या पॉलिथीन बॅगच्या वापरावर बंदी घालण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यात फेकून दिलेल्या पॉलिथीन बॅग संकलनाचा उपक्रम शहरातील सामाजिक संस्था व आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबवणार असल्याचे महापौर किशोर पाटील यांनी सांगितले.