आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरण्यामाळ तलावात पाटाने आले पाणी; दलघफू साठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पाण्याअभावी काेरड्या हाेत जाणाऱ्या हरणमाळ तलावात अखेर अक्कलपाडा धरणाचे वाहते पाणी येऊन पाेहाेचले. एक्स्प्रेस कालव्यातून हे पाणी तलावात अाणण्यात येत अाहे. तब्बल दाेन अाठवड्यांनंतर तलावात पाणी अाले. सध्या दरराेज दलघफू इतका पाणीसाठा हाेत अाहे. याच वेगाने तलावात पाणी अाले तर तब्बल चाळीस दिवसांत तलाव तुडुंब हाेईल. ४५० दलघफू इतकी क्षमता असलेल्या या तलावात सध्या अक्कलपाड्याच्या पाण्यामुळे ९० दलघफू इतका साठा झाला अाहे. हा तलाव पूर्ण भरण्यासाठी जम्बाे कालव्याचाही वापर केला अाहे. त्याचबराेबर नकाणे तलावातही पाणी साेडले जाणार अाहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात केवळ शंभर एमसीएफटी पाणीसाठा उरला अाहे. त्यामुळे या तलावात पाणी कायम राहावे यासाठी नकाणेच्या वरील बाजूने असलेला हरणमाळ तलाव अक्कलपाडा धरणाच्या पाण्याने भरून घेतला जात अाहे. याचा उपयाेग पुढे नकाणे तलावात पाणी साेडण्यात हाेईल. त्यानंतर ते शहरवासीयांसाठी साेडले जाईल. अक्कलपाड्याच्या उजव्या कालव्यातून पाणी साेडण्यात अाले अाहे. सय्यदनगर येथील बंधारा भरल्यानंतर ते पाणी पुढे साेडण्यात अाले अाहे. एक्स्प्रेस कालव्याने साेडलेले पाणी अाता हरणमाळ तलावापर्यंत येऊन पाेहाेचले अाहे. पाटचारीतून येणाऱ्या पाण्याने तलाव भरायला सुरुवात झाली अाहे.

हा तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल. जवळपास ४० दिवसांत हा तलाव काठाेकाठ भरू शकताे. सध्या पाटचारीतून येणाऱ्या पाण्याची धार फारशी वेगवान नाही. त्यामुळे तलाव भरायला वेळ लागेल. मात्र, अाठवडाभरात अक्कलपाडा धरणातून साेडलेल्या पाण्यामुळे या तलावात किमान साठा व्हायला सुरुवात झाली अाहे. सप्टेंबर महिन्यात तारखेपासून पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. हरण्यामाळ तलावात सध्या ९० दलघफू पाणीसाठा निर्माण झाला आहे. हरण्यामाळ तलावाची क्षमता ४५० दलघफू इतकी आहे. पाटचारीतून पाणी हरण्यामाळमध्ये भरणे सुुुुरू झाले आहे. या माध्यमातून प्रथम हरण्यामाळ तलाव भरण्यात येणार आहे. त्यानंतर नकाणे तलाव भरण्यात येणार आहे. अक्कलपाडा धरणातून हे पाणी उपलब्ध झाल्याने तूर्त पाणीपुरवठ्याचे संकट टळले आहे. मात्र, पाणी वापरताना काटकसर करावी लागणार आहे.

४० दिवसांत तुडुंब भरणार
अक्कल पाडाधरणातून पाटचारीद्वारे हरण्यामाळ तलाव भरण्यात येत आहे. हरण्यामाळ तलावात दररोज दलघफू पाणीसाठा निर्माण होत आहे. या प्रकारे हरण्यामाळ तलाव भरण्यास ४० दिवसांचा कालावधी लागणार अाहे.पुरेशा वेगाने पाणी आले तर त्यापेक्षा कमी कालावधी लागू शकतो; परंतु पाऊस नसल्यामुळे वेगाला मर्यादा येतील, असे दिसते. हरणमाळ तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय नकाणे तलावात पाणी साेडता येणार नाही. त्यातून शहराला पुरवठा केला जाताे.

दोन्ही कालव्यांचा पाणी आणण्यासाठी करणार वापर
हरण्यामाळ तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी दोन्ही कालव्यांचा वापर केला जाणार अाहे. सध्या एक्स्प्रेस कॅनालद्वारे पाणी हरण्यामाळमध्ये येत आहे, तर आता शनिवारपासून जम्बो पाटाद्वारे पाणी हरण्यामाळमध्ये येणार अाहे. त्याकरिता जम्बोमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. जम्बो पाटातून दिवसाला साधारणपणे साडेसहा दलघफू पाणी येणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाला सतर्क राहावे लागणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...