आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात बांधकामासाठी पिण्याचे पाणी; पालिकेचे होतेय दुर्लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून पालिकेतर्फे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, इमारतींच्या बांधकामासाठी सर्रासपणे पिण्याच्या पाण्याचा वापर सुरू आहे. इतकेच नव्हे, तर शासकीय इमारतीच्या बांधकामावरही पिण्याच्या पाण्याचा वापर होत आहे.

तापीनदी पात्रातील जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून 1 लाख 70 हजार नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा केला जातो. त्यासाठी पालिकेला दरमहा लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. शहरात सध्या दरडोई 100 लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. एकदिवसाआड होणार्‍या पाणीपुरवठय़ासाठी शहराचे 28 भागात विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार दिवसाआड दोन तास पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पालिकेतर्फे मिळणार्‍या पाण्याचा वापर बांधकामासाठी होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. काही जणांनी अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठी वीजपंपाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे इतर भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते. पालिकेने बंधार्‍याची उंची वाढवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. मात्र, या कामाला बराच काळ लागणार असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

परवानगी नाहीच
बांधकाम सभापती पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून शहरातील एकाही बांधकामाला परवानगी दिलेली नाही. पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर होत असल्यास कारवाई करू.
-जाकीर सरदार, बांधकाम सभापती, भुसावळ