आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात लोकवर्गणीतून पाइप आणूनही घसा कोरडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कमी दाबाने पाणी येत असल्याने शंकरनगर भागातील नागरिक दोन वर्षापासून पालिकेत पाठपुरावा करीत आहेत. कमी व्यासाच्या पाइप लाइनमुळे पाणी येत नसल्याची बाब अधिकार्‍यांनी सांगितली. पालिकेतर्फे नवीन पाइप लाइन बदलवून देत नसल्याने नेहमीच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनीच वर्गणीतून 16 हजार रुपयाचे पाइप व साहित्य खरेदी करून आणले. तरीही वर्षभरात नवीन जोडण्या करून न मिळाल्याने आणलेले साहित्य पडून असून समस्याही सुटलेली नाही.

शिवशंकरनगर भागात सहा इंच व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीवरून अत्यंत कमी दाबाने पाणी उपलब्ध होते. याप्रकरणी 29 डिसेंबर 2011 ते 17 सप्टेंबर 2012 दरम्यान नागरिकांनी आयुक्तांना वेळोवेळी निवेदन दिले होते. त्यानंतर सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकार्‍यांनी पाइप लाइन बदलवावी लागेल असा सल्ला दिला. त्यानुसार नागरिकांनी लोकवर्गणीतून 4 ऑक्टोबर 2012 रोजी नवीन पाइप व इतर साहित्य खरेदी केले. आज या गोष्टीला वर्ष उलटले तरी देखील पालिकेतर्फे काम होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

आमची समस्या कायम
अधिकार्‍यांनी पाइपलाइन घेण्याचे सांगितले होते, वर्गणीतून पैसे गोळा करून 16 हजाराचे साहित्य आणून पडले आहे. अजून 3 ते 4 हजाराचे साहित्य घेणे बाकी आहे.
-किरण माने, रहिवासी

शिवशंकरनगरमधील पाणी समस्या सोडविण्यासाठी पाइप लाइन खरेदीचा विषय मला माहीत नाही. माहिती घेऊन पुढील कारवाई होईल.
-योगेश वाणी, कनिष्ठ अभियंता